scorecardresearch

पालघर : सुंदरम मल्टीपॅप चे संचालक रायचंद शहा यांची निधन

पालघर देवखोप येथील कलापुरनम जीवदया धाम या गोशाळेचे ते संस्थापक सदस्य आणि विद्यमान पदाधिकारी होते.

raychand shah
सुंदरम मल्टीपॅप चे संचालक रायचंद शहा( प्रतिनिधिक छायाचित्र )

शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये अग्रगण्य असणाऱ्या सुंदरम मल्टीपॅप लिमिटेड या कंपनीचे संचालक, सुंदरम सेंट्रल स्कूलचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रायचंद शहा (६०) यांचे आज (२ जुलै) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

१९८७मध्ये पालघर येथे सुंदरम इंडस्ट्रीज या नावाने वह्या तयार करण्याचा कारखाना त्यांच्या कुटुंबांनी सुरू केला. कालांतराने या व्यवसायात वाढ होऊन त्याचे रूपांतर सुंदरम मल्टिपॅप लिमिटेड मध्ये झाले.

१९९० च्या दशकामध्ये बिडको भागातील मूलभूत सुविधां मिळविण्यासाठी तसेच कारखानदारांच्या भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पालघर मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष होते.पालघर भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सीबीएससी बोर्डाची सुंदरम सेंट्रल स्कूल नावाने सुरू झालेल्या शाळेच्या संस्थापक सदस्य आणि मागील आठ वर्ष अध्यक्ष पद ते भूषवत होते.

पालघर देवखोप येथील कलापुरनम जीवदया धाम या गोशाळेचे ते संस्थापक सदस्य आणि विद्यमान पदाधिकारी होते. ढवळे रुग्णालयातील कम्युनिटी केअर कमिटी चे स्थापनेपासून ते अध्यक्ष होते. पालघर येथील कर्णबधिर शाळा चालवणाऱ्या प्रतीक सेवा मंडळचे ते मागील अनेक वर्ष खजिनदार होते. या शासकीय मान्यता मिळवून देण्यात रायचंद शहा यांचे योगदान होते. पालघर परिसरातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी अनेकदा योगदान दिले होते.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Director of sundaram multipap raichand shah passes away amy

ताज्या बातम्या