पालघर: जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. यातून नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी या उद्देशाने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक प्रकाश गायकवाड आणि इतर अधिकारी वर्गाने जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाणे हद्दीत ३४ ठिकाणी नाकाबंदी आणि २३ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून २३ अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शेकडो संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तर विविध कलमांनुसार काहींना अटक केली. मोटार वाहन कायदयानुसार दंडही आकारला गेला. पालघर पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान नाका बंदी, कारवाई पथक व कोम्बिंग ऑपरेशनसाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ राबवले गेले. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी ३३२ पोलीस अंमलदारांच्या सक्रिय सहभागात ही मोहीम राबवली. गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या एकूण २३ वस्त्यांमध्ये एकाच वेळी कोिम्बग ऑपरेशन राबविण्यात आले. या दरम्यान गुन्हे दाखल असलेल्या १२५ आरोपींची तपासणी केली गेली. तर वाडा पोलीस स्थानकात आणि ठाण्यातील दाखल असलेल्या विविध वाहन चोरींच्या गुन्ह्यांची उकल या मोहिमेत झाली आहे. पोलिसांनी दोन लाखांच्या मोटारसायकली आणि मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेदरम्यान २६ जणांविरोधात वॉरंट बजावण्यात आले. तर जुगार प्रकरणात दोन गुन्हे दाखल करून सुमारे सात हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याच बरोबरीने मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन केलेल्या २५४ वाहनधारकांवर कारवाई करून एक लाख दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एक गुन्हा दाखल केला गेला. तर २४ इतर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. विविध कलमांतर्गत सुमारे १३० जणांवर कारवाई केली गेली.

या ऑपरेशनमध्ये १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधीक्षक, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ८ पोलीस निरीक्षक, १३ सहा. पोलीस निरीक्षक, २४ पोलीस उपनिरीक्षक, ३३२ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District police operation all out amy
First published on: 30-07-2022 at 00:05 IST