कासा : साये-उर्से ग्रामपंचायत हद्दीतील आंभिस्ते गावातील लोहारपाडा येथे मद्यधुंद अवस्थेतील पतीने झोपेत असलेल्या पत्नीचा खून करून तिचा मृतदेह घरामागील वाळूच्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे.

आंभिस्ते गावातील लोहारपाडा येथे पांडू धडपा (४४) आणि पत्नी जयवंती धडपा (३७) हे दाम्पत्य त्यांच्या लहान मुलीसह राहात होते. शनिवारी २२ जानेवारी रोजी त्यांची लहान मुलगी गावातील नातेवाईकांकडे राहायला गेली होती. दारूच्या नशेत असलेला पांडू आणि पत्नी जयवंती यांच्यात काही कारणांवरून वाद झाले. पांडू याने पत्नीला मारहाण सुरू केली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. पत्नी मृत झाल्याचे लक्षात आल्यावर पांडूने पत्नीचा मृतदेह घरामागील वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये पुरून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची लहान मुलगी घरी आल्यानंतर आई कुठे आहे, म्हणून विचारू लागली. आई दिसत नसल्याने रडणाऱ्या मुलीच्या आवाजाने शेजारी जमा झाले. सर्व जण जयवंती हिला शोधू लागले. पांडूला खोदून खोदून प्रश्न विचारल्यानंतर त्याने रात्री भांडणादरम्यान पत्नीची हत्या केल्याचे आणि मृतदेह घरामागे पुरल्याचे सांगितले. सदर घटनेची माहिती मिळाल्यावर तात्काळ घटनास्थळी दाखल होत, वाणगाव पोलिसांनी आरोपी पांडू धडपा याला अटक केली आहे. सदर घटनेचा तपास वाणगाव पोलीस ठाण्याचे श्रीकांत कोळी करत आहेत.

wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Abhishek suffered a heart attack during a visit to Delhi zoo
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा मृत्यू, मृतदेह पाहताच पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं आयुष्य