Premium

डहाणू: कासा बाजार पेठेत आग; आगीत पाच दुकाने जळून खाक

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

fire in dhanu
कासा बाजार पेठेत आग ( Image – लोकसत्ता टीम

डहाणू तालुक्यातील कासा येथे मुख्य बाजारपेठेत भीषण आग लागली असून एकूण पाच दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत. शुक्रवार १२ मे रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली असून शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कासा गावातील पोलीस ठाणे समोरील एका दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी तात्काळ डहाणू येथील अदानी थर्मल पॉवर स्टेशनच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दल अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले असून एकूण पाच दुकानांना आपल्या विळख्यात घेतले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five shops gutted in major fire in dahanu zws