डहाणू: डहाणू शहरामधील घाचीया खाडीत कचऱ्याचा खच पडला आहे. पुलाजवळ प्लास्टिकच्या पिशव्या, वेष्टणे आणि कचरा पडून खाडी प्रदूषित होऊ लागल्याने परिसरातील जागरूक नागरिकांना प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे. याबाबत मंडळाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे कळवले आहे.
प्लास्टिक कचऱ्यामुळे खाडीचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होतात. पाणी तुंबते आणि कचरा कुजून दुर्गंधी पसरते. या घाणीमुळे मलेरियासारखे आजार पसरण्याची भीती असते.
डहाणू शहरातून वाहणाऱ्या आणि समुद्राकडे जोडल्या गेलेल्या घाचीया खाडीच्या जलाराम मंदिराजवळील पुलाजवळ प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडला आहे. डहाणू डेपोच्या मागून वाहणाऱ्या खाडीच्या भागातही कचरा पडला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असले तरी नागरिकांकडून मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. परिषदेने दररोज ओला आणि सुका कचरा जमा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. परिणामी प्लास्टिक कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी साचलेले दिसतात.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2022 रोजी प्रकाशित
डहाणूतील घाचीया खाडीत कचऱ्याचा पूर;खाडी प्रदूषणाबाबत पर्यावरण विभागाकडे तक्रार
डहाणू शहरामधील घाचीया खाडीत कचऱ्याचा खच पडला आहे. पुलाजवळ प्लास्टिकच्या पिशव्या, वेष्टणे आणि कचरा पडून खाडी प्रदूषित होऊ लागल्याने परिसरातील जागरूक नागरिकांना प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-04-2022 at 00:08 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage flood ghachia creek dahanu complaint environment department regarding creek pollution amy