scorecardresearch

अनिता पाटील यांना गोदावरी परुळेकर समाजरत्न पुरस्कार

पालघर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कॉम्रेड गोदावरी परुळेकर समाजरत्न पुरस्कार यंदा अनिता संदीप पाटील यांना जाहीर झाला आहे.

कासा : पालघर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कॉम्रेड गोदावरी परुळेकर समाजरत्न पुरस्कार यंदा अनिता संदीप पाटील यांना जाहीर झाला आहे. कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, तलासरी येथे २८ एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अनिता पाटील यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून अनिता पाटील पालघरच्या ग्रामीण भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी तसेच तेथील नागरिकांसाठी समाजकार्य करत आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Godavari parulekar samajratna award anita patilv social academic work amy

ताज्या बातम्या