डहाणू : डहाणूतील सरकारी आरोग्य केंद्र, रुग्णालयात वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. सरकारकडून या भागातील आरोग्य संस्थांसाठी कोटय़वधींचा निधी पुरवला जातो. मात्र त्यानंतरही येथील आरोग्य व स्थिती दयनीय आहे. अनेक दवाखान्यांच्या इमारती आहेत, मात्र त्यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी गुजरात येथे धाव घ्यावी लागत आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू कॉटेज  व उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक औषधांची कमतरता आहे. हीच परिस्थिती कासा उपजिल्हा रुग्णालयात आहे. दारिदय़्र रेषेखालील रुग्णांना मोफत आरोग्य सेवेसाठी आरोग्य कार्डाचे वाटप केले गेलेले आहे, मात्र त्यांनाही अपुऱ्या औषधांमुळे खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-गुजरात सीमा भागात राहणारे येथील बहुतेक रुग्ण महाराष्ट्रापेक्षा गुजरात येथे रुग्णालयात उपचारांसाठी धाव घेताना दिसतात.  डहाणू उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण १४ पदे मंजूर आहेत. त्या मंजूर १४ पदांपैकी कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी बालरोगतज्ज्ञ, सर्जन, बधिरीकरणतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यातील महत्त्वाची अनेक पदे रिक्त असुन या रिक्त पदांमुळे डहाणू उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government hospitals in dahanu in worse situation zws
First published on: 16-08-2022 at 15:50 IST