वाडा:  अंबाडी-दिघाशी या रस्त्यालगत असलेल्या एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शासकीय औषधांचा साठा अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही औषधे शासनाच्या आरोग्य विभागातून देण्यात येणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडच्या (लोहयुक्त) गोळय़ा आहेत. अंबाडी गावातील नाझिब धुरू हा तरुण सकाळीच चालण्यासाठी (मॉर्निग वॉक) दिघाशी रस्त्याला जात असताना एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात या गोळय़ांची पूर्ण भरलेली शेकडो पाकिटे अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आली.  त्यांनी ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान या गोळय़ांची मुदत (एक्सपायरी डेट) निघून गेलेली आहे. जुना साठा असल्याने या औषधांची विल्हेवाट लावण्यात आली असावी असे बोलले जात आहे. या गोळय़ा हिंदूस्थान लॅबोरेटरी पालघर या ठिकाणी तयार होऊन शासनाकडे आल्यानंतर त्या संबंधित आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी ठिकाणी वितरित केल्या जातात. यापैकी शासनाच्या कुठल्या तरी आरोग्य केंद्रातून या गोळय़ा टाकण्यात आल्या असाव्यात असे सांगितले जाते.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government medicines garbage on road stock of government medicines ysh
First published on: 08-03-2023 at 00:02 IST