पालघर : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेकडील गट-क मधील १८ संवर्गातील १३ हजार ५१४ रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने जाहीर भरती प्रक्रियेपैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदे २७ एप्रिलपर्यंत भरण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. असे असताना पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा राखण्यासाठी रिक्त पदांच्या ७० टक्के प्रमाणात ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने अनुमती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानुसार २७ एप्रिल २०२३ पर्यंत या पदावरील उमेदवारांची नियुक्ती आदेश देण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  जिल्ह्यात गट-क मधील आरोग्य सेवक महिला व पुरुष, औषध निर्माण अधिकारी व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदांवरील १०४२ पदांपैकी ७१० पदे रिक्त असून रिक्त पदांच्या ७० टक्के म्हणजेच ४९५ हंगामी पद्धतीने कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येईल. यामुळे नियमित पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बाह्य यंत्रणेमार्फत या हंगामी भरतीला मान्यता देण्यात आली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health staff recruitment soon advertising quality health care maintain ysh
First published on: 19-11-2022 at 00:02 IST