पालघर : परतीच्या मुसळधार पावसासह सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे पालघर तालुक्यातील वैतरणा वाढीव गावातील वयोवृद्ध दाम्पत्याच्या राहत्या घराचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. वाढीव गावातील पद्माकर पाटील यांच्या घराच्या शेजारील पडीक घराची भिंत राहत्या घरावर कोसळली. पाटील यांच्या पत्नी या घटनेतून सुदैवाने बचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पद्माकर पाटील व त्यांची पत्नी गाढ झोपेत असताना गुरुवारी पहाटे साडेसहा वाजता ही घटना घडली.  राहत्या घरावरील पत्रे, भिंत, टीव्ही यांच्यासह घरातील अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच केळवा सागरी पोलीस यांच्यासह तलाठी किरण जोगदंड, ग्रामसेवक महेश किणी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घराच्या व अन्य वस्तूंच्या नुकसानीचा त्यांनी पंचनामा केला असता, यात एकूण ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. दरम्यान, वाऱ्यामुळे पालघर शहरातील माहीम-मनोर हायवे नेस्ट हॉटेल समोर मोठे झाड कोसळले. त्यामुळे चार ते पाच  दुचाकींचे नुकसान झाले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy damage house collapse due to rain citizens in problem ysh
First published on: 15-10-2022 at 11:36 IST