नगर परिषदेच्या नगरसेवकांसह प्रशासनाचा कानाडोळा

पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्र सध्या जाहिरात फलकांच्या विळख्यात सापडले आहे. नगर परिषदेमार्फत वार्षिक जाहिरात ठेका देण्यात आला असला तरी परवानगी न घेता अनेक व्यवसायिकांमार्फत राजरोस जाहिरात फलक लावले जात आहेत. त्यामुळे शहर विद्रुपीकरणासह नगरपरिषदेला मोठे नुकसान होत आहे. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये या जाहिरातींचा विळखा दिसत असताना नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागासह त्या त्या प्रभागांतील नगरसेवक या बाबींकडे कानाडोळा करत आहेत. अशा बेकायदा फलकबाजीवर कारवाई होत नसल्याने बेकायदा जाहिरातबाजीचे पेव फुटले आहे. अनेक गृहसंकुले, इमारत विकासक, विविध खासगी योजना असलेले दुकानांचे फलक, खाजगी शाळा, बालवाडय़ा यांसह राजकीय पक्षांचे व इतर जाहिरात फलक मोठय़ा प्रमाणात शहरांमध्ये बेकायदा पद्धतीने झळकताना दिसत आहेत. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी हे फलक लावण्यात आले असले तरी त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा बेकायदा फलकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची मागणी पुढे येत आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत

शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेले वीज खांब, शहरातील झाडे याला तारा व सर्रास खिळे ठोकून फलक लावले जातात. यामुळे  झाडांचीही मोठी हानी होत आहे. तसेच वेळप्रसंगी महावितरणच्या विजतांत्रीना दुरुस्तीसाठी खांबावर चढण्यास हे फलक अडथळा ठरत आहेत. अनेक वळणाच्या रस्त्यावर फलक लावल्याने समोरील येणारे वाहन दिसत नाही. अशावेळी अपघाताची शक्यता आहे. बेकायदा फलकांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचे सध्या फलकांच्या सुळसुळटावरून अधोरेखित होत आहे. पालघर शहरातील सोनोपंत दांडेकर मार्ग, नवनीत भाई शहा मार्ग, कचेरी रस्ता, टेंभोडे-पालघर रस्ता, देवी सहाय रस्ता, माहीम-मनोर हायवे या मुख्य रस्त्याशिवाय अनेक अंतर्गत रस्ते,गल्ली बोळातील परिसरही जाहिरातदारांनी सोडलेले नाहीत. तर काही खाजगी कार्यालयांनी आपल्या नावाचे व पत्त्यांचे लोखंडाचे कायमस्वरूपी फलक  रस्त्यात, रस्त्याच्या कडेला कोणतीही परवानगी न घेता उभारले आहेत. अनेक वेळा बेकायदा फलकांचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला असताना नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून नगर परिषद प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड होत आहे.

विनापरवाना जाहिरात फलकांवर आधीही कारवाई करण्यात आली होती.मात्र त्यानंतरही जाहिरात फलक लावले जातात. आता अशा बेकायदा जाहिरातदारावर दंडात्मक रक्कम आकारून जाहिरात फलक हटवले जातील.

– डॉ. उज्वला काळे,  नगराध्यक्षा, पालघर नगर परिषद