scorecardresearch

सेवा रस्ते बेकायदा वाहनतळ

चारोटी उड्डाणपूल परिसरात हॉटेल शेरे पंजाब, हॉटेल मल्लिका, हॉटेल अप्सरा हॉटेल आणि सूर्या असे अनेक छोटे मोठे ढाबे आणि हॉटेल आहेत. 

सेवा रस्ते बेकायदा वाहनतळ

कासा : चारोटी उड्डाणपूल परिसरातील सेवा रस्त्याच्या आसपास अनेक हॉटेल आणि ढाबे आहेत. या हॉटेल्स आणि ढाब्यांच्या बाजूच्या सेवा रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने थांबवली जात आहेत. त्यामुळे सेवा रस्त्याचा वापर करताना अडचणी येत आहेत. अवजड वाहनांमुळे बऱ्याचदा  सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडीही होत आहे. 

चारोटी उड्डाणपूल परिसरात हॉटेल शेरे पंजाब, हॉटेल मल्लिका, हॉटेल अप्सरा हॉटेल आणि सूर्या असे अनेक छोटे मोठे ढाबे आणि हॉटेल आहेत.  अवजड वाहनांचे चालक सेवा रस्त्यावरच वाहने लावून हॉटेलमध्ये जेवायला जातात. तर काही वाहन चालक सेवा रस्त्यावर गाडी लावून त्या ठिकाणी स्वयंपाक बनवत असतात. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याचदा थांबलेले वाहनचालक आणि सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळते. तरी स्थानिक महामार्ग पोलीस आणि वाहतूक नियंत्रण पोलीस यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या