scorecardresearch

कंत्राटी अभियांत्रिकीच्या अपघाती मृत्यूची चौकशी ; तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील घटना

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील केंद्र १ व २ मध्ये काम करणाऱ्या पराग मोरे (२३) या स्थानीय कंत्राटी अभियांत्रिकीचा शनिवारी मध्यरात्री अपघाती निधन झाले.

पालघर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील केंद्र १ व २ मध्ये काम करणाऱ्या पराग मोरे (२३) या स्थानीय कंत्राटी अभियांत्रिकीचा शनिवारी मध्यरात्री अपघाती निधन झाले. काही दिवसांपूर्वी काम करत असताना तो उंचीवरून खाली पडला होता. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील केंद्र १ व २ मधील रेडिएशन वेस्ट बिल्डग अर्थात किरणोत्सर्ग कचरा साठवण्याच्या २५ ते ३० फूट उंचीच्या या इमारतीच्या छताचे वॉटरप्रूिफगचे काम सुरू होते. १२ मे रोजी झालेल्या कामाचे मोजमाप घेताना तसेच सुरू कामाची देखरेख करताना दुपारी पावणेचारच्या सुमारास पराग मोरे उंचीवरून खाली पडले. त्यांना तातडीने बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर किचकट शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांचा १४ मेच्या रात्री मृत्यू झाला.
तारापूर येथील हा कंत्राटी अभियंता नव्याने कामावर लागला होता. विशेष म्हणजे अपघात घडला तेव्हा त्याच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी व सुपरवायझर घटनास्थळी नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी एनपीसीआयएल सुरक्षा विभागाच्या उच्चस्तरीय सुरक्षा समितीने या अपघाताची चौकशी सुरू केली असून शवविच्छेदन करून त्यावर रविवारी अंतिम संस्कार करण्यात आले. मृतांच्या कुटुंबीयांना टॅप्स व्यवस्थापनातर्फे मदत करण्यात येईल असे सांगण्यात आले.
या संदर्भात कॅप्स प्रशासनाशी संपर्क साधला असता अपघातामध्ये कंत्राटी कामगार मृत झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला असून या घटनेबाबत चौकशी सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inquiry accidental death contract engineer incident tarapur atomic energy project amy

ताज्या बातम्या