पालघर: जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळांची व इतर खेळाच्या मैदान विकासकामात भ्रष्टाचार व शासकीय निधी अपहार झाल्याचे उघड झाले आहे. त्याची चौकशी करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शाळा मैदान दुरुस्तीसाठी पालघरच्या क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक तालुक्याला चार लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. प्रत्यक्षात शाळेतील मैदानाची दुरुस्ती, विकास न करता  तसे भासवून काही शिक्षकांनी हा निधी थेट ठेकेदारास अदा केला. डहाणू तालुक्यात जि.प.शाळा डेहणे कोठारपाडा येथे चार लाख निधीतून फक्त चार गाडय़ा मुरूम माती टाकण्यात आली. तर जि.प.शाळा कापशी आदिवासी पाडा येथे काम न करता दोन लाख रुपये ठेकेदाराला देण्यात आले.   जिल्हा परिषद शाळा रणकोळ येथील दोन शाळांच्या ठिकाणी मैदानाचे काम न करता निधी अदा करण्यात आला आहे. जिल्हा परिषद दाभोण साग देवपाडा येथेही हीच स्थिती आहे. फक्त डहाणू तालुका नव्हे तर इतर तालुक्यांमध्येही हा विषय गंभीर आहे. इतर तालुक्यातही अशाच प्रकारची कामे न करता देयक ठेकेदारांना अदा केली गेल्याची माहिती समोर येत आहे.

 विकासकाम दाखवून ते न करता शासकीय निधी थेट ठेकेदाराला अदा करण्यामागे वरिष्ठ स्तरावरून दबाव येत असल्याचे काहींनी सांगितले. यामागे डहाणू पंचायत समितीतील एक उच्च पदाधिकारी व पालघर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सामील असल्याची जोरदार चर्चा आहे.

Victim education
सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
pimpri police commissioner office marathi news, pimpri police commissioner office latest news in marathi
पिंपरी : अखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय
Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी

मैदानाची कामे

क्रीडांगण  तयार करताना  त्यात, २०० मीटर अथवा ४०० मीटरचा धावण्याचा मार्ग, मैदानाला भिंत-तारेचे कुंपण, विविध खेळांची  मैदाने, प्रसाधनगृह,  पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाते.  क्रीडा साहित्यासाठी भांडारगृह,  प्रकाश व्यवस्था,  साहित्य खरेदी, प्रेक्षक गॅलरी, आसन,  ड्रेनेज व्यवस्था आदी कामे केली जातात. त्यासाठी  जिल्हा नियोजन समितीमधून शाळांना अनुदान दिले जाते.

मैदान विकासकामाच्या नावाखाली विकास न करता शासकीय निधीचा अपहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. जुनी मैदाने ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई व्हावी अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.

– ज्ञानेश्वर सांबरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती,जि.प.पालघर