पालघर: जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळांची व इतर खेळाच्या मैदान विकासकामात भ्रष्टाचार व शासकीय निधी अपहार झाल्याचे उघड झाले आहे. त्याची चौकशी करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शाळा मैदान दुरुस्तीसाठी पालघरच्या क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक तालुक्याला चार लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. प्रत्यक्षात शाळेतील मैदानाची दुरुस्ती, विकास न करता  तसे भासवून काही शिक्षकांनी हा निधी थेट ठेकेदारास अदा केला. डहाणू तालुक्यात जि.प.शाळा डेहणे कोठारपाडा येथे चार लाख निधीतून फक्त चार गाडय़ा मुरूम माती टाकण्यात आली. तर जि.प.शाळा कापशी आदिवासी पाडा येथे काम न करता दोन लाख रुपये ठेकेदाराला देण्यात आले.   जिल्हा परिषद शाळा रणकोळ येथील दोन शाळांच्या ठिकाणी मैदानाचे काम न करता निधी अदा करण्यात आला आहे. जिल्हा परिषद दाभोण साग देवपाडा येथेही हीच स्थिती आहे. फक्त डहाणू तालुका नव्हे तर इतर तालुक्यांमध्येही हा विषय गंभीर आहे. इतर तालुक्यातही अशाच प्रकारची कामे न करता देयक ठेकेदारांना अदा केली गेल्याची माहिती समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 विकासकाम दाखवून ते न करता शासकीय निधी थेट ठेकेदाराला अदा करण्यामागे वरिष्ठ स्तरावरून दबाव येत असल्याचे काहींनी सांगितले. यामागे डहाणू पंचायत समितीतील एक उच्च पदाधिकारी व पालघर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सामील असल्याची जोरदार चर्चा आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inquiry corruption ground development works ysh
First published on: 26-01-2022 at 00:02 IST