कासा : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने दीड वर्षांपूर्वी जव्हार येथे १३२ केव्ही क्षमतेचे वीजपुरवठा उपकेंद्राचे काम कोटय़वधी रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी पूर्ण केले. पण उपकेंद्राचे काम पूर्ण झाले तरी उपकेंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. उपकेंद्र सुरू नसल्याने जव्हार मोखाडा, तालुक्यातील १६४ गावांतील वीजग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास अंधारात राहण्याची वेळ येते.

सद्य:स्थितीत डहाणू, जव्हार, मोखाडा या तालुक्यांत वीजपुरवठा करण्यासाठी आशागड, गंजाड, सूर्यानगर येथे ३३ केव्हीची उपकेंद्र आहेत. तर जव्हार आणि मोखाडा येथे २२ केव्हीची उपकेंद्र आहेत, या सर्व उपकेंद्रांना डहाणू येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्रातुन मुख्य वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. ही मुख्य वीजवाहिनी ४० ते ४५ वर्षे जुनी असल्याने पावसाळय़ाच्या दिवसांमध्ये वीजवाहिनीच्या तारा तुटतात, वादळ पाऊस यामुळे या वीजवाहिनीचे खांब उन्मळून पडतात. त्यामुळे गंजाड, सूर्यानगर, जव्हार, मोखाडा या सर्व उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित होतो. हा सर्व भाग अंधारात जातो. या समस्येतून वीज ग्राहकांची सुटका व्हावी, जुन्या वीजवाहिनीत बिघाड झाला तरी जव्हार मोखाडा येथील वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्र वीज महामंडळाने तीन वर्षांपूर्वी जव्हार येथे नवीन १३२ केव्ही वीजपुरवठा क्षमतेच्या उपकेंद्राचे काम पूर्ण केले. परंतु अद्यापही जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्राला वीज पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ८० किमीच्या वीजवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने हे उपकेंद्र कार्यान्वित झालेले नाही.

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
maharashtra registered a record revenue collection from registration and stamp duty
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केला विक्रम
bandra worli sea link marathi news,
आजपासून वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील प्रवास महागणार, नवीन पथकर दर लागू

जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्राला ज्या वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा होणार आहे. त्या वीजवाहिनीचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. सदर वीजवाहिनीचा ३७ किमी भाग हा वनविभागाच्या जमिनीवरून जाणार आहे. त्यामुळे या भागात काम करण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये निवेदन दिलेले आहे. वनविभागाच्या परवानग्या घेण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने या वाहिनीचे काम संथ गतीने सुरू असल्याचे समजते.

जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्र पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील १६४ गावांना या उपकेंद्रातुन वीजपुरवठा होणार आहे. तसेच डहाणू येथून आशागड, गंजाड, सुर्यानगर या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला तर जव्हार १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्रातून वीजपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे जव्हार येथील वीजपुरवठा उपकेंद्र कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरी सदरील वीजपुरवठा उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी वीज ग्राहक करत आहेत.

जव्हारच्या १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यासाठी ८० किमी वीजवाहिनीचे काम सुरू आहे. वीजवाहिनीचे ३७ किमी भाग हा वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. त्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना डिसेंबर २०१९ मध्ये निवेदन दिलेले आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी हे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून परवानगी देणार आहेत. – विवेक टाळणीकर, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण