कासा : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने दीड वर्षांपूर्वी जव्हार येथे १३२ केव्ही क्षमतेचे वीजपुरवठा उपकेंद्राचे काम कोटय़वधी रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी पूर्ण केले. पण उपकेंद्राचे काम पूर्ण झाले तरी उपकेंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. उपकेंद्र सुरू नसल्याने जव्हार मोखाडा, तालुक्यातील १६४ गावांतील वीजग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास अंधारात राहण्याची वेळ येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सद्य:स्थितीत डहाणू, जव्हार, मोखाडा या तालुक्यांत वीजपुरवठा करण्यासाठी आशागड, गंजाड, सूर्यानगर येथे ३३ केव्हीची उपकेंद्र आहेत. तर जव्हार आणि मोखाडा येथे २२ केव्हीची उपकेंद्र आहेत, या सर्व उपकेंद्रांना डहाणू येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्रातुन मुख्य वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. ही मुख्य वीजवाहिनी ४० ते ४५ वर्षे जुनी असल्याने पावसाळय़ाच्या दिवसांमध्ये वीजवाहिनीच्या तारा तुटतात, वादळ पाऊस यामुळे या वीजवाहिनीचे खांब उन्मळून पडतात. त्यामुळे गंजाड, सूर्यानगर, जव्हार, मोखाडा या सर्व उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित होतो. हा सर्व भाग अंधारात जातो. या समस्येतून वीज ग्राहकांची सुटका व्हावी, जुन्या वीजवाहिनीत बिघाड झाला तरी जव्हार मोखाडा येथील वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्र वीज महामंडळाने तीन वर्षांपूर्वी जव्हार येथे नवीन १३२ केव्ही वीजपुरवठा क्षमतेच्या उपकेंद्राचे काम पूर्ण केले. परंतु अद्यापही जव्हार येथील १३२ केव्ही वीजपुरवठा उपकेंद्राला वीज पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ८० किमीच्या वीजवाहिनीचे काम अपूर्ण असल्याने हे उपकेंद्र कार्यान्वित झालेले नाही.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawahar power supply substation maharashtra state electricity corporation amy
First published on: 07-07-2022 at 00:04 IST