scorecardresearch

पालघर: कनिष्ठ झिंबाब्वे संघाचा सफाळ्यात सराव

आशियाई उपखंडाच्या वातावरण व खेळपट्टीचा सराव करण्यासाठी झिम्बाब्वे चा २३ वर्षाखालील संघ पालघर तालुक्यातील सफाळे येथील मैदानावर सरावासाठी दाखल झाला आहे.

Junior Zimbabwe team training in Safala amy 95
आशियाई उपखंडाच्या वातावरण व खेळपट्टीचा सराव करण्यासाठी झिम्बाब्वे चा २३ वर्षाखालील संघ पालघर तालुक्यातील सफाळे येथील मैदानावर सरावासाठी दाखल झाला

आशियाई उपखंडाच्या वातावरण व खेळपट्टीचा सराव करण्यासाठी झिम्बाब्वे चा २३ वर्षाखालील संघ पालघर तालुक्यातील सफाळे येथील मैदानावर सरावासाठी दाखल झाला आहे. २८ दिवसांच्या या वास्तव्यादरम्यान हा संघ दररोज एक हजार चेंडूंचा सराव करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुबई लगत असणाऱ्या या क्रिकेटच्या प्रगत सुविधा परदेशी उदयोन्मुख खेळाडूंसाठी व संघासाठी पर्वणी ठरत आहे.

सफाळा येथील ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट मैदानावर असलेल्या हिरव्यागार खेळपट्टीवर हा संघ चार दिवसीय चार सामने खेळणार असून त्याला फिरकी गोलंदाज तसेच लाल मातीच्या खेळपट्टीवर चेंडू टप्प्याचा अंदाज येण्यासाठी या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये झिंबाब्वेच्या १९ वर्षाखालील संघाने या ठिकाणी सराव केल्यानंतर त्या खेळाडूंच्या खेळामध्ये प्रगती जाणवली होती. मैदानी खेळासोबत या ठिकाणी असलेल्या बंदिस्त (इनडोअर) प्रशिक्षण केंद्रात झिंबाब्वे संघ सराव करीत आहे. या संघातील उभरत्या फलंदाजांना दररोज एक हजार चेंडू खेळण्याची संधी व मार्गदर्शन या प्रशिक्षण शिबिरात घेत आहेत.

झिम्बाब्वे येथे स्थानीय पातळीवर खेळला जाणाऱ्या चार दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा “लोगान कप” स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्यामध्ये परदेशी खेळाडूंचा सहभाग वाढला आहे. आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त असणाऱ्या या देशामधील नागरिकांनी फुटबॉल ऐवजी क्रिकेटला अधिक पसंती दिल्याने या झिम्बाब्वे मधील या खेळाचे अर्थकरण बदलले आहे. राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार ईल्टन चिगुंमबुरा यांच्या प्रशिक्षणाखाली हा संघ सफाळे येथील मैदानावर तसेच इकडे असणाऱ्या इतर सर्व सुविधांच्या वापर करून खेळाची तंत्र विकसित करण्यावर भर देत आहेत.

मोझेस चितारे हे या संघाचे व्यवस्थापक असून या प्रशिक्षणात सामन्यात विजय मिळविण्यापेक्षा येथील खेटपट्टी समजून घेऊन त्या अनुरूप फलंदाजी व गोलंदाजी करण्याचा सराव मिळणे आमच्या संघासाठी सुवर्ण संधी आहे. भारतात प्रथमच येणाऱ्या खेळाडूंना येथील वातावरणाशी समरस होण्यास विशेष त्रास झाला नाही. उपलब्ध सोयी सुविधांमुळे झिंबाब्वे चे नवोदित खेळाडू आनंदी आहेत आहेत असे या संघासोबत असणारे प्रवक्ते फ्रॅंक मावोझा यांनी सांगितले.

सफाळे ची निवड का केली?

मुंबई लगत असणाऱ्या या लहाशा गावात नामांकित क्रीडांगण प्रमाणे सुविधा किफाट्याशीर दरामध्ये उपलब्ध आहे. मुंबई व इतर किनारपट्टीच्या ठिकाणांप्रमाणे वातावरण असल्याने शिवाय मुंबई जवळ असल्याने निसर्ग समृद्ध वातावरणात प्रशिक्षण घेणे सोयीचे ठरत आहे. या ठिकाणी असणाऱ्या बंदिस्त (इनडोअर) प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेता येत असल्याने प्रशिक्षण कालावधीत खेळावर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करणे शक्य होते.

इतर कोणत्या देशातील संघानी केला होता सराव

झिंबाब्वे च्या १९ वर्षाखालील मुलं व मुलींच्या संघासह युगांडा, दुबई, येथील संघानी सफाळे येथे सराव केला आहे. आगामी काळात निजेरिया संघ येथे येणार आहे. या सोबत सिक्कीम, त्रिपुरा येथील संघ देखील या ठिकाणी सरावासाठी या पूर्वी आले आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 22:09 IST

संबंधित बातम्या