मुक्या प्राण्यांमध्ये देखील भावना, प्रेम आणि दया असते याचे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. मात्र पालघर मध्ये असाच एक बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे . पालघरच्या वानगाव आणि बावडा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची मोठी दहशत आहे .

या बिबट्याने आजपर्यंत अनेक पाळीव प्राण्यांना फस्त केलंय . मात्र याच बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास एका कुत्र्याच्या लहान पिल्लावर दया दाखवल्याचं या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल आहे . बावडा येथील गणपती मंदिर समोर मध्यरात्री बिबट्याने शिकार करण्यासाठी कुत्र्यांचा पाठलाग केला.

मात्र यावेळी मोठे कुत्रे पळून गेले असून दोन लहान पिल्लं मागे राहिली यातील एक पिल्लू थेट बिबट्याच्या तावडीत सापडल असून या बिबट्याने या पिल्लाला कोणतीही इजा न करता सुखरूप सोडून दिलं . ही सर्व घटना समोर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या बिबट्या विषयी देखील समाज माध्यमांवर आता संवेदना व्यक्त होते .