scorecardresearch

कोटय़वधी खर्चूनही कुपोषण कायम; आठ वर्षांत साडेतीन हजार बालकांचा बळी 

पालघर जिल्ह्यात कुपोषण समस्या दूर व्हावी यासाठी कोटय़वधी रुपये प्रशासनाकडून खर्च केले जात आहेत; परंतु ही समस्या अद्याप कायम असून गेल्या आठ वर्षांत तीन हजार ६०९ बालकांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे.

कोटय़वधी खर्चूनही कुपोषण कायम; आठ वर्षांत साडेतीन हजार बालकांचा बळी 

पालघर : पालघर जिल्ह्यात कुपोषण समस्या दूर व्हावी यासाठी कोटय़वधी रुपये प्रशासनाकडून खर्च केले जात आहेत; परंतु ही समस्या अद्याप कायम असून गेल्या आठ वर्षांत तीन हजार ६०९ बालकांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे. तर शंभर मातांचा मृत्यू झाला आहे. कुपोषण निर्मूलन अभियान राबविण्यात शासन-प्रशासनाला अपयश आले आहे. हेच या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी व वाडा अशा ग्रामीण भागांमध्ये कुपोषणाबरोबरीने बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये बालविवाहासारख्या अनिष्ट रूढी-परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत. गेल्या पाच वर्षांत पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. ठाणे जिल्हा असताना जव्हारमधील वावर-वांगणीमध्ये कुपोषण व बालमृत्यूच्या आकडेवारीचा स्फोट झाला होता. संपूर्ण राज्यातून या प्रकाराबाबत संताप व हळहळ व्यक्त करण्यात आली होती. कुपोषणाबाबत न्यायालयानेही राज्य शासनाला फटकारले होते. मात्र अजूनही बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे.

दहा महिन्यांत १५० बालमृत्यू

यंदा दहा महिन्यांत दीडशेपेक्षा जास्त बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर आठ ते दहा मातामृत्यू झाले आहेत. मात्र मृत्यूचे प्रमाण यापेक्षा अधिक असल्याचे म्हटले जात आहे. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू हे मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे झाले आहेत. कुपोषण, कमी दिवसांत जन्मलेले बाळ, कमी वजनाचे बाळ, इतर आजार, अपघात, श्वासोच्छ्वास कोंडणे अशा विविध कारणांनीही बालमृत्यू होत आहेत. ० ते ६ वर्षांच्या वयोगटातील ही बालके आहेत. 

मुदतपूर्व प्रसूती आणि मेंदुज्वर

मुदतपूर्व प्रसूतीमुळे २०१५-१६ मध्ये ७४ बालके, २०१६-१७ : ६४, २०१७-१८ : ६५, २०१८-१९ : ५९, २०१९-२० : ३८  तर जानेवारी २१ पर्यंत ३८ बालकांचा मृत्यू झालेला आहे. मेंदुज्वरामुळे २०१५-१६ व्या वर्षांत १०७ बालकांचा मृत्यू झालेला आहे. तर २०१६-१७ मध्ये ५७ बालके दगावली आहेत. २०१७-१८ मध्ये ९०, २०१८-१९ : ४५, २०१९-२० : २ तर २०२०-२१ : ४ अशा ३०५ बालकांचा मृत्यू झालेला आहे.

कारणे काय?

ल्ल पालघर जिल्ह्यात आतापर्यंत कमी दिवसांत जन्मलेली बालके दगावल्याची संख्या लक्षणीय आहे. तर मुदतपूर्व प्रसूती, जन्मत: श्वासोच्छवास कोंडून, तीव्र फुप्फुस विकार, अपघात, जन्मत: व्यंग, जंतुसंसर्ग, प्राणी व सर्पदंश, हृदयविकार, ताप, डायरिया, अतिसार, हायपोथेरिमिया, पचनसंस्था दोष, दमा, मेंदुज्वर अशा आजारांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

पालघरमधील स्थिती

वर्ष बालके      माता

२०१४-१५ ६२६        निरंक

२०१५-१६       ५६५   निरंक

२०१६ -१७      ५५७   १८ 

२०१७-१८   ४६९    १९

२०१८-१९    ३४८   १३ 

२०१९-२०    ३०३    १०

२०२०-२१    २९६    १२

२०२१-२२    २९४    २०

ऑक्टोबरपर्यंत  १५१    ०७

कुपोषण, बाल व मातामृत्यू हे वास्तव असले तरी त्याच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणा एकत्रित काम करीत आहेत. आणखी जोमाने सातत्यपूर्ण काम करून सकारात्मक निकाल येत्या काळात दिसेल अशी ग्वाही देतो. 

– प्रकाश निकम, अध्यक्ष, जिप, पालघर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या