पालघर : पालघर जिल्ह्यात कुपोषण समस्या दूर व्हावी यासाठी कोटय़वधी रुपये प्रशासनाकडून खर्च केले जात आहेत; परंतु ही समस्या अद्याप कायम असून गेल्या आठ वर्षांत तीन हजार ६०९ बालकांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे. तर शंभर मातांचा मृत्यू झाला आहे. कुपोषण निर्मूलन अभियान राबविण्यात शासन-प्रशासनाला अपयश आले आहे. हेच या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी व वाडा अशा ग्रामीण भागांमध्ये कुपोषणाबरोबरीने बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये बालविवाहासारख्या अनिष्ट रूढी-परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत. गेल्या पाच वर्षांत पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. ठाणे जिल्हा असताना जव्हारमधील वावर-वांगणीमध्ये कुपोषण व बालमृत्यूच्या आकडेवारीचा स्फोट झाला होता. संपूर्ण राज्यातून या प्रकाराबाबत संताप व हळहळ व्यक्त करण्यात आली होती. कुपोषणाबाबत न्यायालयानेही राज्य शासनाला फटकारले होते. मात्र अजूनही बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malnutrition persists despite spending billions three and a half thousand children killed in eight years ysh
First published on: 08-12-2022 at 00:02 IST