scorecardresearch

Premium

पालघर: पत्नीच्या ऐवजी पतीने केले लेखापरीक्षण; पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊनही गुन्हा दाखल नाही

यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पालघरच्या स्टेशन व्यवस्थापकाला तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

man doing audit work in central booking office instead of appointed woman officer in palghar
पालघर रेल्वे स्थानक

पालघर रेल्वे स्थानकामध्ये असणाऱ्या तिकीट घरात (सेंट्रल बुकिंग ऑफिस) मध्ये सुरू असलेल्या कामकाजाचे लेखा परीक्षण करण्यासाठी नेमलेल्या महिला अधिकाऱ्याऐवजी चक्क त्यांच्या पतीने हे काम करण्याची घटना पालघर मध्ये घडली. याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर वरिष्ठांनी पालघर स्टेशन व्यवस्थापकांना तोतया कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सूचना केल्या. मात्र रेल्वे सुरक्षा दलाने संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर सहा तास उलटल्यानंतर देखील रेल्वे पोलीस अथवा रेल्वे सुरक्षा दलात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा >>> वारली कलेतून नैसर्गिक शेतीचे धडे, वायेडा बंधूंच्या तिसऱ्या पुस्तकाचे जर्मनीत प्रकाशन

action taken against nine students of rajiv gandhi college over ragging in hostel
ठाण्याच्या राजीव गांधी महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई; समितीच्या चौकशीत रॅगिंग केल्याचे उघड
ubt Leaders continue to hold corner meetings despite prohibitory orders
ठाण्यात महाविकास आघाडी आणि पोलिस संघर्ष वाढण्याची चिन्हे; ठाकरे गटाच्या चौकसभांना पोलिसांकडून मनाई
husband arrested for doing audit work in central booking office instead of appointed woman officer in palghar
पालघरमध्ये पत्नीऐवजी पतीने केलं लेखापरीक्षण; अधिकारी असल्याचा बनाव रचणाऱ्या तोतयाला अटक
epfo money
अर्थ मंत्रालयाच्या संमतीविना ‘पीएफ’ व्याजदर जाहीर करण्यास मज्जाव

पालघर रेल्वे स्थानकात असलेल्या सेंट्रल बुकिंग कार्यालयात सकाळी नऊ वाजता आपण ऑडिटर (लेखापरीक्षण करणारे अधिकारी) असल्याचे सांगत एका इसमाने प्रवेश घेतला. त्यांनी या कार्यालयातील सर्व कागदपत्रांची झाडझडती घेतली. त्यांच्या एकंदर वर्तुणुकीवरून संशय आल्याने पालघर येथे स्थित वाणिज्य निरीक्षकांनी याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली. त्यानंतर लेखापरीक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती महिला असून त्याच्या ऐवजी तिचे पती काम करत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा >>> पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची सेवा विस्कळीत

यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पालघरच्या स्टेशन व्यवस्थापकाला तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही घटना समजल्यानंतर संबंधित महिला अधिकारी यांनी पालघर रेल्वे स्थानक गाठून हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. पालघरच्या आरपीएफ कार्यालयामध्ये या तोतया कर्मचाऱ्याला ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरित करून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र रेल्वे पोलीस जीआरपी यांनी आपल्याकडे सदरचा इसम व तक्रार देण्यासाठी कोणीही आले नाही असे सांगितले, यामुळे या प्रकरणात सहा तास उलटल्यानंतर देखील कोणतीही फिर्याद नोंदवण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. संबंधिताविरुद्ध फिर्याद दाखल झाल्यानंतर तपशील जारी केला जाईल असे रेल्वे पोलिसांनी लोकसत्तेला सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man doing audit work in central booking office instead of appointed woman officer in palghar zws

First published on: 27-09-2023 at 18:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×