मुरबाड येथील ग्रामस्थांचे लक्षवेधी आंदोलन

पालघर/डहाणू : निवडणुकीच्या काळात रस्ता करण्याच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने मुरबाड वेती ग्रामस्थांनी दुरवस्था झालेल्या रस्त्यांना लोकप्रतिनिधींच्या नावे खडकाळ मार्ग आंदोलन आयोजित करून त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. वेती हनुमान नगर ते मुरबाड गेटीपाडा या सुमारे साडेतीन किलोमीटर रस्त्याचा पट्टा १९९३ साली प्रथम तयार करण्यात आला होता. तेव्हापासून बऱ्याच लांबीच्या रस्त्याच्या पट्टय़ावर रस्त्याचे काम झालेले नाही. विशेषत: गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्यावर कोणताही खर्च झालेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना या खडतर मार्गावरून प्रवास करणे भाग पडत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व उभारणी करण्याचे आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी २०१९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. विशेष म्हणजे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी दोन वेळा नारळ वाढवण्यात आला, मात्र प्रत्यक्षात काम झाले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. सन २०२१ च्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सुनील भुसारा यांनीदेखील रस्त्याच्या डांबरीकरणाचे आश्वासन दिले होत. या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने ‘खासदार राजेंद्र गावित खडकाळ मार्ग’ व  ‘आमदार सुनील भुसारा खडकाळ मार्ग’ असे या रस्त्याचे नामकरण करून ग्रामस्थांनी शुक्रवारी अनोखे आंदोलन  केले.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

या आंदोलनादरम्यान मुरबाड-कासा प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅजिक गाडीला बैल बांधून मिरवणूक काढण्यात आली. तसेच मातीने भरलेल्या खड्डय़ांमुळे रस्ता शेणाने सारवून त्यावर नामकरण करून रांगोळी काढण्यात आली. या आंदोलनात गावातील तरुण व महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती. ग्रामपंचायत सदस्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने सध्या या गावांमध्ये प्रशासक नेमण्यात आला आहे.  ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांची शासनापर्यंत योग्य पद्धतीने वाचा फोडली जात नसल्याने हे आंदोलन करणे भाग पडले, असे ग्रामस्थांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.