गुजरात मत्स्यव्यवसाय खात्याच्या उपसंचालकांची यांची राष्ट्रीय मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी घेतली भेट

Efforts to release Palghar fishermen from Pakistan Jail पालघर: राज्यातील १९ खलाशांसह देशातील २०० पेक्षा अधिक मच्छिमार खलाशी पाकिस्तानच्या तुरुंगात कारावास भोगत असून त्यांच्या सुटकेसठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल व इतर पदाधिकाऱ्यांनी गुजरातच्या मत्स्य व्यवसाय विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

७ नोव्हेंबर २०२५  रोजी ओखा येथे नलनारायण मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करणारे सातपाटी येथील नामदेव बाळकृष्ण मेहेर यांच्यासह अन्य आठ खलाशांना मासेमारी बोटीसह पाकिस्तान ने ताब्यात घेतल्याबाबत माहिती मिळाली. त्यांच्या कुटुंबीयांना स्थानिक मच्छीमार तसेच मच्छीमार संघटनांच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन धीर दिला. अटकेत मच्छीमार खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार असल्याचे कुटुंबीयांना आश्वासन दिले.

राष्ट्रीय मच्छीमार संघटना अर्थात नॅशनल फिश वर्कर फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी ओखा, पोरबंदर येथील बोट असोसिएशन चे अध्यक्ष मनोज मोरी, जीवन जुंगी तसेच जेष्ठ पत्रकार जतीन देसाई यांच्यामार्फत बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह दिल्ली फोरम चे संचालक तसेच पाकिस्तान इंडिया पिपल्स फोरम फॉर पिस ऑफ डेमोक्रसी चे सदस्य जतिन देसाई पाकिस्तानी पकडलेल्या बोटीबाबत तपशील मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

मात्र काही दिवस ही बोट समुद्रातच ठेवल्याने भारतीय व पाकिस्तान मच्छिमार नेत्यांना त्याची माहिती मिळाली नाही. १० नोव्हेंबर रोजी गुजरात, गांधीनगरला कोस्ट गार्ड च्या वार्षिक सभे मध्ये वरील बोटीची माहिती देऊन तटरक्षक दलाने (कोस्ट गार्ड) या प्रकरणात लक्ष देण्याबाबत आवाहन करण्यात आले.

रामकृष्ण तांडेल यांनी बाब मच्छीमार नेत्यांनी गुजरात राज्याचे मत्स्यव्यवसाय खात्याचे उपसंचालक रमेशकुमार शेखरालिया यांची गुजरात मधील मच्छिमार नेते

अशोक श्रीमाली व चंद्रकांत पटेल यांच्या समवेत भेट घेऊन पाकिस्तानी ताब्यात घेतलेल्या बोटीबद्दल माहिती दिली. पाकिस्तानी नव्याने अटक केलेल्या खलाशांना तसेच यापूर्वी अटकेत असणाऱ्या खलाशांची लवकरात लवकर सोडवण्या साठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली.

नव्याने अटक असलेल्या गुजरात मधील सात खलाशां बाबत केंद्र शासनाकडून कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. पाकिस्तान मध्ये अटकेत असलेले १९७ खलाशांना लवकरात लवकर सोडविण्यासाठी परराष्ट्र मंत्री यांची भेट घेऊ असे नॅशनल फिशवर्कर्स फोरम चे अध्यक्ष व पाकिस्तान इंडिया पिपल्स फोरम फॉर पिस अँड डेमोक्रसी चे सदस्य रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.