पालघर : पालघर जिल्ह्याला स्वतंत्र नवीन कार्यालय स्थापनेला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिली. यासंदर्भात पुढील आठवड्यात आवश्यक शासन निर्णय काढण्यात येतील असे त्यांनी पालघर येथील लोक दरबार च्या सुरुवातीला घोषित केले. त्यामुळे पालघरला विरार पाठोपाठ पालघरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय उपलब्ध होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोक दरबाराची आयोजन केले होते. आपण धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलो तरी ठाण्यालगत असणाऱ्या व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष जवळच असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण लोकदरबार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार तर्फे राबवत असणाऱ्या योजना सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत असल्याचे आपण या लोकदरबारात आपण पाहणारचो उपस्थित अर्जदार व जनाचे जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
दरम्यान पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख तसेच जिल्हाप्रमुख यांनी सातत्याने मागण व पाठपुरावा केल्याने पालघर साठी नव्याने परिवहन कार्यालय पाण्यासाठी जागा मंजूर झाली असेल नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिली. याच महिन्यात हे कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार असून यासंदर्भात शासन निर्णय पुढील आठवड्यात जारी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनेक वर्षांची मागणी मार्गस्थ
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तर राहणाऱ्या नागरिकांना वाहनांच्या परवाना मंजूरी व नूतनीकरण करण्यासाठी वसई येथे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालघर येथे राज्य शासनाने दिलेल्या जागेत प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून पुढे येत होती. ही मागणी मंजूर झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत असणाऱ्या रिक्षा चालक-मालक संघटन समाधान व्यक्त केले आहे.
सूर्या पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी भेट
मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सूर्या प्रकल्पाच्या वसई, विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एमएमआरडीएच्या योजनेची पाहणी केली. सूर्यानगर येथील एम.एम.आर.डी.ए. च्या प्रकल्पाची सरनाईक यांच्याकडून पाहणी. मिरा-भाईंदरकरांना पाण्यासाठी शासन तारीख पे तारीख देत असल्याच सांगत सरनाईक यांच्याकडून सरकारला घरचा आहेर दिला.
या ठिकाणची पाहणी केल्या नंतर त्यांनी योजनेचा घेतला आढावा घेतला. संबंधित योजना सहा महिन्यात पूर्ण होऊन मीरा-भाईंदर वासियांना पाणीपुरवठा होणार असल्याची सरनाईक यांच्याकडून माहिती देण्यात आली. तर विविध शहरांसाठी सूर्या प्रकल्पामधील पाणी आरक्षित केल्याने पालघर मधील सिंचन क्षेत्र कमी झालं याकडे लक्ष आधण्यात आले. यावर शासन योग्य तोडगा काढणार असल्याचा सरनाईक यांनी आश्वासन दिले.
एमएच – ५९ पालघर साठी राखीव
पालघर जिल्हा मुख्यालय संकुलाजवळ उमरोळी हद्दीमध्ये असणाऱ्या १० एकर जगते प्रादेशिक परिवहन मंडळाचे कार्यालयीन वास्तू उभारण्यात येणार असून पालघर जिल्ह्याच्या आरटीओ कार्यालयातून नव्याने परवाना देण्यात येणाऱ्या वाहनांना एमएच – ५९ असा क्रमांक निश्चित करण्यात असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. यापूर्वी मीरा-भाईंदर येथे नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्याला एमएच – ५८ हा क्रमांक देण्यात आला आहे.
उमरोळी येथे परिवहन विभागासाठी निश्चित केलेल्या जागेच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अद्ययावत कार्यालय इमारत उभारण्यात येणार असून पुढील पन्नास वर्ष या भागात सुसज्ज कार्यालय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने या कार्यालयाची आखणी करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री यांनी स्पष्ट केले.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या पालघर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात अवजड वाहनावाहनांकरिता तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या खाजगी बस, रिक्षां यांच्यासाठी स्वतंत्र चाचणी ट्रॅक उभारण्यात येणार असून या कामाला विद्यमान वर्षात सुरुवात होईल वर्षात सुरुवात करू असे श्री. सरनाईक यांनी स्पष्ट केले.