कासा : जव्हार हे निसर्गरम्य आणि थंड हवेचे उंच ठिकाण आहे. येथे अनेक पर्यटनस्थळे आहे. पावसाळय़ात येथील निसर्गाला अधिक भर येतो. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे यंदाही पर्यटकांनी येथील पर्यटनाचा आनंद अनुभवण्यासाठी आपली पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गनिर्मित जव्हार तालुक्यात संस्थांकालीन नवा-जुना राजवाडा, शिरपामाळ, हनुमान पॉइंट तर दाभोसा, काळमांडावी, हिरडपाडा असे निसर्गरम्य धबधबे आहेत. या भागात पर्यटक आल्यानंतर येथील स्थानिक नागलीची गरम गरम भाकरी, उडदाचा भुजा, मिरचीचा ठेचा, गावठी कोंबडा आणि या भागातील डोंगरदऱ्यातील निसर्गनिर्मिती रानपालेभाज्यांचा आस्वाद घेतात. धबधब्यावरती जाण्यासाठी पर्यटकांची विशेष ओढ असते.

जव्हारला पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा मिळाल्याने, निसर्गरम्य ठिकाणी शनिवार आणि रविवारसह रोजच शेकडो पर्यटक येथे हजेरी लावतात. मात्र आनंद घेताना मौजमजा करताना अनेक वेळा या पर्यटनस्थळी आपला जीव गमवावा लागणाऱ्या घटना घडत असतात. मागील दोन वर्षांपूर्वी एकाच वेळी पाच तरुणांचा पाय घसरून काळमांडावी डोहात पडून मृत्यू झाला होता. तसेच मागील वर्षी कामोठे, ठाणे येथील ४५ वर्षीय पर्यटकाचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे. अनेक तरुण पर्यटनस्थळी मद्यप्राशन तिथे दंगामस्ती करत असल्यामुळे असे प्रकार घडतात. त्याकरिता आठवडय़ातील शनिवार व रविवार अशा दोन दिवस जव्हार पोलीस ठाणेअंतर्गत पोलीस बंदोबस्त ठेवल्यास अशा प्रकारांवर बंदी येईल. त्यासाठी येथे पोलीस बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Mahayuti, Palghar,
मनसेच्या मतांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार पालघरमधून विजयी होणार- अविनाश जाधव
palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Sonia Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray will enjoy family happiness after election says Dr Dinesh Sharma
सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निवडणुकीनंतर पारिवारिक सुख उपभोगता येईल- डॉ. दिनेश शर्मा
Uddhav Thackeray Train Travel
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा बोईसर ते वांद्रे ट्रेनने प्रवास, फोटो आणि व्हिडीओ चर्चेत

धबधब्यांचा आनंद
दाबोसा, काळमांडवी हिरडपाडा असे अनेक धबधबे येथे आहेत. ते पाहण्यासाठी ठाणे-गुजरात नाशिक- सेलवास- वाडा- विक्रमगड या ठिकाणाहून पर्यटक डोंगरदऱ्यातील नैसर्गिक धबधबा पाहायला येतात. जव्हार शहरापासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या केळीच्या पाडा या गावापासून तीन किमी अंतरावर आत गेल्यावर काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते. काळशेती नदीवरून हा धबधबा पडत असल्याने त्याचे नाव काळमांडवी असे पडल्याचे म्हटले जाते. पावसाळय़ात मातीचा रस्ता चिखलमय होत असल्यामुळे गावाच्या शेजारी वाहने थांबवून पर्यटनस्थळी जावे लागते. जव्हार शहरापासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावाच्या शेजारी असणारा धबधबा खूप मोठा व उंचीवरून कोसळणारा आहे या धबधब्यापर्यंत जायला पुरेशी चांगले व्यवस्था नाही मात्र थोडी पायपीट केली तर निसर्गरम्य असा हिरडपडा धबधबा पर्यटकांना पाहावयास मिळतो हा धबधबा लेंडी नदीवरील आहे.

काळमांडवी धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. तिथे खाली उतरून पर्यटक मौजमजा करतात. परंतु तिथे मोठा डोह असून त्या डोहात पडण्याची भीती असते. यापूर्वी पर्यटक या डोहात पडण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. त्यासाठी जर तिथे पोलीस बंदोबस्त असला तर पर्यटकांना सूचना देऊन त्याचा जीव वाचू शकतो. – योगेश खिरारी, ग्रामस्थ केळीचापाडा