scorecardresearch

Premium

अवकाळी पावसाचा वाडा तालुक्याला फटका, १५८९ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४९ लक्ष रुपयांचे नुकसान

२४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वाडा तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १३८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले आहे.

Over 1588 hector farming land affected by unseasonal rains in November
या पावसात सर्वाधिक नुकसान हे वाडा तालुक्याचे झाल्याचे दिसून आले आहे. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वाडा तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १३८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एकंदर भात, नाचणी, वरई या जिरायत पिक व बागायती पिके यांचे एकूण १५८९ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले असून नुकसान भरपाईसाठी १४९ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

Four times increase in dengue patients in East Vidarbha
नागपूर : पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत चारपट वाढ!
sexual abuse minor girl amravati district hospital multai village madhya pradesh marathi
अमरावती : मामाने केले १४ वर्षीय भाचीचे लैंगिक शोषण; वैद्यकीय तपासणीनंतर…
Ganpur boat tragedy
सुनेला वाचविण्यासाठी सासूने हात दिला अन् दोघीही बुडाल्या; गणपूर नाव दुर्घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात हळहळ
collector vipin Itankar announced the revised voter list of nagpur district
नागपूर जिल्ह्यात नवमतदार वाढले, कौल ठरणार निर्णायक

पालघर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर डहाणू व तलासरी तालुक्यात कमी होता. डहाणू व तलासरी क्षेत्रात कोणत्याही शेतकरी किंवा बागायतदाराचे नुकसान झाल्याचे दिसून आले नाही. या पावसात सर्वाधिक नुकसान हे वाडा तालुक्याचे झाल्याचे दिसून आले आहे.

आणखी वाचा-पालघरच्या बहाडोली व बदलापूर येथील जांभळांना भौगोलिक मानांकन

भात, नाचणी, वरई या जिरायत पिकांच्या नुकसानीचा आढावा कृषी विभागाने महसूल व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केला असून जिल्ह्यातील १३५१ हेक्टर जिरायत क्षेत्र बाधित दिसल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. वाडा तालुक्यात ११५३ हेक्टर व मोखाडा तालुक्यात १४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्यातील २३८ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला व कडधान्य क्षेत्र बाधित झाले असून त्यामध्ये बहुतांश नुकसान वाडा तालुक्याचे झाल्याचे दिसून आले आहे. नुकसान भरपाईसाठी देण्यात येणाऱ्या रकमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

आणखी वाच-पालघर : कालव्यांच्या दुरवस्थेमुळे सूर्या प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात सातत्याने घट, आधुनिक सिंचन प्रणालीकडे दुर्लक्ष

वाडा तालुक्यासाठी १३२ लक्ष रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बोली द्यावयाची असून मोखाडा तालुक्यात १२.३१ लाख रुपये, विक्रमगड तालुक्यात १.७४ लाख, जव्हार तालुक्यात १.४५ लाख रुपयांचा नुकसान झाले असून पालघर, वसई तालुक्यातील नुकसान भरपाईची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वाडा: १३८८
मोखाडा: १४५
विक्रमगड: २०
जव्हार: १५
पालघर: ११
वसई: ९

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Over 1588 hector farming land affected by unseasonal rains in november mrj

First published on: 07-12-2023 at 17:23 IST

आजचा ई-पेपर : पालघर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×