वाडा:  पालघर जिल्ह्यात येत्या गुरुवारपासून ३३ खरेदी केंद्रांवर भात, नाचणी खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे. या वर्षी लवकर भात खरेदी सुरू होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, पालघर, वसई, वाडा, विक्रमगड या आठ तालुक्यांतील एकूण ३३ केंद्रांवर ही खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जव्हारचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांनी दिली.  पालघर जिल्ह्यात भाताचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या वाडा तालुक्यात सर्वाधिक ९ खरेदी केंद्रे असणार आहेत. पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, कासा व मनोर या चार उपप्रादेशिक कार्यालयअंतर्गत येणाऱ्या एकूण ६७८ गावांतील ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या खरेदी योजनेचा फायदा होणार आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy procurement center to start in palghar district zws
First published on: 02-11-2022 at 04:13 IST