scorecardresearch

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; विक्रमगड तालुक्यातील घटना

रविवारी सुट्टीच्या दिवशी ती घराशेजारी असलेल्या जंगलात गेली व तिकडेच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

he bride fell from the third floor of the building and died
लग्न झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच नवरीचा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

वाडा:  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येत असलेल्या विक्रमगड तालुक्यातील कावळे या शासकीय आश्रमशाळेत अकरावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी संध्याकाळी बास्ते येथे घडली.

विक्रमगड तालुक्यातील मौजे बास्ते येथील रविना रमेश हांडवा (१७) ही विद्यार्थिनी रोज बास्ते येथील तिच्या राहत्या घरून ये-जा करून कावळे आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात कला (आर्ट) विभागात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी ती घराशेजारी असलेल्या जंगलात गेली व तिकडेच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्याप्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून येथील पोलीस निरीक्षक प्रदीप गिते पुढील तपास करीत असून आत्महत्येचे निश्चित कारण समजलेले नाही. हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 02:41 IST