पालघर: पालघर जिल्ह्यात सन २०२६ मध्ये सद्यस्थितीत ६६२ नागरिकांना डेंगू झाल्याची शासकीय दप्तरी नोंद असली तरीही प्रत्यक्षात त्याच्या काहीपटीने अधिक नागरिकांना डेंगूची बाधा झाल्याची दिसून आले आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे आवश्यक झाले असून गेल्या दोन महिन्यात पावसाने उघडीप घेतल्याने निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे डेंगू पसरवणाऱ्या मच्छरांच्या पैदास होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्ष पावसाच्या जोरदार सरी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहत असत. अशा मुसळधार पावसाच्या समय तळी, व स्थानिक पातळीवर साचलेल्या पाण्याच्या स्त्रोत्रा मधील डासांच्या अळ्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात असत. यंदाच्या हंगामात ऑगस्ट महिन्यापासूनच पावसाची तीव्रता कमी होऊन सप्टेंबर महिन्यात काही मोजक्या भागातच पावसाने हजेरी लावली होती. शिवाय सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासूनच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ऑक्टोबर हीट प्रमाणे उष्णतेचे प्रमाण वाढले होते.

पालघर जिल्ह्यातील अनेक नागरिक नोकरी धंदा निमित्ताने मुंबई, ठाणे व गुजरात राज्यात प्रवास करत असतात. अशा स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना डेंगूची लागण झाल्यास व डेंगू पसरवणारा एडिस इजिप्ती डासाची पैदास होण्यासाठी स्वच्छ पाण्याचे साठे (कंटेनर क्षेत्र) उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यू मुळे नागरिक बाधित झाल्याचे दिसून आले आहेत. विशेष म्हणजे आजाराची तीव्रता पाहता अनेकांना रुग्णालयात दाखल करणे क्रमप्राप्त झाले असून डेंगूमुळे एकही नागरिकाचा मृत्यू झाला नाही असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेंगू सदृश्य लक्षणं दिसल्याने २१६५ नागरिकांच्या रक्त नमुन्यांची तपासणी केली असता २५२ नागरिकांना डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच कालावधी जिल्ह्याच्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रासह शहरी भागात तपासणी केलेल्या ३४५४ रक्त नमुन्यांपैकी ३४७ नागरिकांना डेंगू झाल्याचे दिसून आले आहे. तर २६ ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील तपासलेल्या ४०७ नमुन्यांपैकी ६३ रुग्णांचे डेंगू झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. ग्रामीण भागात जुलै (५०), ऑगस्ट (७२) व सप्टेंबर (२३) महिन्यात डेंगू चे रुग्ण आढळले असून शहरी भागात जुलै महिन्यात ५९, ऑगस्ट महिन्यात ९३ व सप्टेंबर महिन्यात ५८ आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाकडून प्राप्त झाली आहे. मात्र यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत रक्त तपासणी केलेल्या किंवा निदान झालेल्या रुग्णांचा अंतर्भाव नसून प्रत्यक्षात डेंगू रुग्णांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे खाजगी वैद्यकीय सल्लागार व डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डेंगूचा प्रसार

डेंगूच्या प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती होण्यासाठी काही स्वच्छ पाणी असणे पुरेसे असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छ पाण्याचे साठे असणारे अनेक कंटेनर क्षेत्र असल्याने ३०-३२ अंश सेल्सिअस पेक्षा तापमान झाल्यास डेंगू फसवणाऱ्या डासांची उत्पत्ती सात दिवसापेक्षा कमी वेळेत होते. अशा डासांमार्फत दिवसा एक ते तीन किलोमीटर परिघातील नागरिकांना डेंगू चा प्रसार अशाच डासांमार्फत होणे शक्य असून यंदाच्या हंगामात पावसाने लवकर उघडीब घेतल्याने या आजाराचा प्रसार वाढल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी सांगितले.

डेंगू प्रसार रोखण्यासाठी डेंगू पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती साखळी रोखणे याकरिता स्वच्छ पाण्याची क्षेत्र नष्ट करणे आवश्यक असून पावसाच्या काही मुसळधार सरी पडल्यास प्रजननादरम्यान असणाऱ्या डेंगू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या वाहून गेल्यास हे प्रमाण नियंत्रणात येऊ शकेल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची मान्य आहे.

प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपायोजना

जिल्हा हिवताप विभागाने जिल्ह्यातील अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या २० कर्मचाऱ्यांचा पालघर नगर परिषदेचे १५ व विभागातील आठ कर्मचाऱ्यांच्या मार्फत पालघर शहर परिसरात ऑगस्ट महिन्यात चार दिवस विशेष मोहीम राबवली. पालघर शहरातील विविध लोक वस्ती भागात ६७३५ घर संख्या (२५५३६ लोकसंख्या) परिसरात ताप असणाऱ्या नागरिकांचे केली असता २८२ क्षेत्रातील १६ रक्त जल नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी दोन नागरिकांना डेंगू तर एका अन्य रुग्णाला डेंग्यू मलेरिया असा मिश्र आजार झाल्याचे निष्पन्न आले होते. आढळलेल्या रुग्णांच्या अनुषंगाने ३५० स्वच्छ पाण्याचे साठे (कंटेनर रिकामी करण्यात आले असून आवश्यकतेनुसार टेमिफॉस औषधाची फवारणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. या खेरीज ग्रामीण भागात देखील अशाच प्रकारे स्वच्छ पाण्याचे साठे नाश करण्यासाठी उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

नवरात्रो उत्सवा दरम्यान नागरिकांमध्ये डेंगू विषयी जनजागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी माहितीपर फलक लावण्यात आले असून यासह या कार्यक्रमादरम्यान डेंगू विषयी माहिती देणारे ऑडिओ क्लिप देखील वाजवण्याचे काम करण्यात येत आहे.