scorecardresearch

पोलिसांच्या नौकेवरील पाच जणांना वाचविले

तासभर खोल समुद्रात शोधमोहीम राबवत असताना भरकटलेली अशोका नौका टेंभी गावाच्या समोर समुद्रात शोधण्यात यश आले.

fishermen rescue five policemen from sinking patrolling boat
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पालघर : समुद्रात भरकटल्यानंतर लाटांच्या माऱ्यामुळे बुडत असलेल्या पालघर पोलिसांच्या गस्ती नौकेला शोधून त्यावरील पाच जणांना वाचविण्यात केळवे सागरी पोलिसांना व मच्छीमारांना यश आले आहे.

पोलिसांची गस्ती नौका टेंभीसमोरील खोल समुद्रात लाटांच्या माऱ्याने बुडू लागल्यानंतर नौकेवरील कर्मचाऱ्यांनी केळवे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. पोलिसांची अशोका ही गस्ती नौका केळवे ते दातिवरे समुद्रात शुक्रवारी गस्तीसाठी गेली होती. सुमारे सात नॉटिकल खोल समुद्रात गेल्यानंतर नौका भरकटली व लाटांच्या माऱ्यात अडकली. जोरदार लाटांच्या माऱ्याने पाणी नौकेत जाऊ लागले. नौकेत मोठय़ा प्रमाणात पाणी शिरल्याने नौका बुडण्याची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी  नौकेवरील एका अधिकाऱ्याने तत्काळ प्रसंगावधान राखत गायकवाड यांच्या मोबाइलवर संपर्क साधला व मदतीचा धावा केला. गायकवाड यांनी  लक्ष्मीप्रसाद नौकेतून शोध मोहिमेसाठी दुपारी २ च्या सुमारास रवाना केले. तासभर खोल समुद्रात शोधमोहीम राबवत असताना भरकटलेली अशोका नौका टेंभी गावाच्या समोर समुद्रात शोधण्यात यश आले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 03:23 IST

संबंधित बातम्या