पालघर : समर्पित मालवाहू रेल्वे मार्गेके करिता पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे फटके बंद करण्यात आली असून केळवे रोड व सफाळे दरम्यान असणाऱ्या रोठे रेल्वे फाटका ला पर्याय म्हणून उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाची समस्या सोडविण्यात रेल्वे व्यवस्थापनाला अपयश आले आहे. याचा फटका केळवे रोड च्या पूर्वेकडील किमान ५००० नागरिकांना होत बसत असून अनेक आदिवासी विद्यार्थी या समस्येमुळे शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून आले आहे.
समर्पित मालवाहू रेल्वे मार्गीगेच्या दृष्टीकोनातून केळवे रोड व सफाळे दरम्यान रोठे येथील फाटक क्रमांक ४४ बंद करण्यापूर्वी या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्यात आला होता. या परिसरात दरवर्षी सरासरी २५०० मिलिमीटर पावसाची नोंद होत असून भुयारी मार्गात पाणी साचून मार्गीका बंद होईल अशी भीती आरंभी पासून व्यक्त करण्यात येत होती.
प्रत्यक्षात दोन वर्षापूर्वी या भुयारी मार्गाच्या उभारणी दरम्यान काँक्रीट करण्यामध्ये असणाऱ्या गळती मधून मोठ्या प्रमाणात पाणी झीरपल्याने भुयारी मार्गात दोन ते अडीच फूट पाणी साचत असे. त्यावर उपाय म्हणून कॉंक्रिटीकरणामधील गळती बंद करून या भुयारी मार्गात स्वयंचलित इलेक्ट्रिक पंप व डिझेल पंप बसवण्यात आला. तरी देखील गेल्या वर्षी भुयारी मार्गात पाणी व चिखल साचण्याचे प्रकार घडत राहिले.
यंदाच्या पावसाळ्यात स्थानिकांना भुयारी मार्गामधील समस्यांपासून अडचण निर्माण होणार नाही म्हणून पश्चिम रेल्वे (एमआरव्हीसी) ने डिझेल पंप तर डीएफसीसी (समर्पित मालवाहू रेल्वे मार्गेका) यांनी स्वयंचलित विद्युत पंप व त्याकरिता स्वतंत्र रोहित्र बसवले आहे. मात्र अनेकदा महावितरणचा विज परवठा खंडित होत असल्याने अथवा विद्युत पंप सकाळी सहा वाजल्यानंतर चालविला जात असल्याने पहाटे पाच वाजताच्या लोकलला जाणारे प्रवासी व सकाळच्या सत्रात शाळेतील विद्यार्थ्यांना दीड ते दोन फूट पाण्यातून प्रवास करावा लागतो. या भुयारी मार्गाच्या पश्चिमेला एमआरवीसी ने डिझेल पंप बसवला असला तरी तू चालवताना होणाऱ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अनेकदा या भुयारी मार्गातील प्रकाश व्यवस्था बंद असल्याने सर्पाच्या भीतीने नागरिक व विद्यार्थी भुयारी मार्गातून अंधाराच्या वेळेत प्रवास करण्याचे टाळतात. यामुळे किमान ५००० नागरिकांना त्रास भोगाव लागत असून अनेक आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षणात खंड पडताना दिसून आला आहे. या खेरीज नोकरदार वर्ग व महिलांना देखील भुयारी मार्गामधील साचणारे पाणी व चिखल याचा त्रास होत असेल जिल्हा प्रशासन तसेच रेल्वे व्यवस्थापनाने गेल्या दोन वर्षापासून ही समस्या सोडवण्यास अपयश आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
उड्डाणपुलाचा प्रश्न भिजत
केळवे रोड पश्चिम व पूर्व भागाला जोडण्यासाठी उड्डाणपूल करण्याची मागणी स्थानिक आणि केली होती. त्याला जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाने तत्वतः मान्यता दर्शवली होती. मात्र या पुलाच्या उभारणीसाठी ठिकाण व पोहच सुरज त्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक असल्याने त्या आराखड्याबद्दल निश्चित होत असल्याने या उड्डाणपूल चा प्रस्ताव रखडून पडला आहे
