पालघर : ऑनलाईन औषध विक्री म्हणजेच ‘ई-फार्मसीच्या वाढत्या अनियंत्रित व्यवसायाविरोधात आणि मोठ्या कॉर्पोरेट डिस्काउंटच्या निषेधार्थ बुधवार, २० मे रोजी देशव्यापी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ च्या या आवाहनाला पाठिंबा देत पालघर जिल्ह्यातील देखील सर्व केमिस्ट आणि औषध दुकाने २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहेत.

या आंदोलनात देशभरातील १२ लाखांहून अधिक औषध विक्रेते सहभागी होत असून, पालघर जिल्ह्यातही याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आणि असोसिएशनने काही तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत.

नियमित औषध खरेदीमध्ये अडचण येऊ नये म्हणून सर्व नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार व इतर दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी आपली अत्यावश्यक औषधे पालघर शहरातील आपत्कालीन मेडिकल मधून दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून घ्यावीत. समाजाचे आरोग्य सुरक्षित करणे हेच आमचे ध्येय, या भावनेने पुकारण्यात आलेल्या या देशव्यापी आंदोलनात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालघर मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

संप नेमका कशासाठी

कृत्रिम बुद्धिमत्ता च्या माध्यमातून बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून दिली जाणारी औषधे रोखा.

ऑनलाईन माध्यमातून कफ सिरप आणि सवय लागणाऱ्या अंमली औषधांची विनाचौकशी होणारी घरपोच डिलिव्हरी थांबवा.

केंद्र सरकारचे GSR 817 (दि. 28.08.2018) आणि कोविड काळातील GSR 220 (दि. 26.03.2020) हे कायदे त्वरित मागे घ्या.

कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे दिली जाणारी अव्यवसायिक सूट बंद करा, ज्यामुळे छोटे व्यावसायिक संकटात आले आहेत.

बंदच्या काळात अत्यंत तातडीच्या प्रसंगी नागरिकांना औषधे मिळावीत यासाठी पालघर मेडिकल असोसिएशनने मेडिकल स्टोअर्स आणि त्यांच्या प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

न्यू प्रणाम मेडिकल (कचेरी रोड) – 9730164746

भारत मेडिकल (उडुपी सद्गुरु समोर) – 9890129574 |

लक्ष्मी मेडिकल (रिलायन्स मॉल समोर) – 8983945466

वरुण मेडिकल (टेंभोडे रोड) – 8830764280

शालिमार मेडिकल (जुना पालघर) – 9226208111

ऑल केअर मेडिकल (पेट्रोल पंपाजवळ) – 8087366226 |

ओम मेडिकल (लोकमान्य नगर) – 9673279779

V4 मेडिकल (सुंदरम) – 7769950500

नोबल मेडिकल (पालघर पूर्व) – 9769463338

नोबल केमिस्ट (नॅशनल बेकरी समोर) – 9769640351

साई केमिस्ट (माहिम गाव) – 9834474568

सातपाटी मेडिकल (सातपाटी गाव) – 9764657574

श्री गजानन मेडिकल (शिरगाव) – 9518395267

धनानी केमिस्ट (धनानी हॉस्पिटल समोर) – 7559306624

भवानी केमिस्ट (कचेरी रोड) – 9823191942 |

..

औषधांची ऑनलाईन विक्री व ई-फार्मसी विरोधात आमचा हा एकदिवसीय संप आहे. नागरिकांना गैरसोय होऊ नये याकरिता पालघर शहरातील काही प्रमुख मेडिकल धारकांचे आपत्कालीन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयांच्या आवारात असलेली औषधांची दुकाने सुरू राहणार आहेत. — फैज धनानी, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पालघर