पालघर : शहराचा विकास पाहता पालघरच्या मालमत्ता करामध्ये ४० टक्के वाढ होण्याचे अपेक्षित असताना सन २००८ पासून नगरपरिषदेने शहरांमधील मालमत्तेचे पुनर्मुल्यांकन झालेले नाही. नगरपरिषदेच्या या रूपाने होणाऱ्या आर्थिक नुकसानीवर आळा घालण्यासाठी पालघर नगरपरिषद नव्याने पुनर्मूल्यांकन प्रक्रिया राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर नगर परिषदेने गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या तसेच सर्वसाधारण बैठकीचे आयोजन नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. पालघर शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीला ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण तसेच हॉकर, हातगाड्या फेरीवाले व इतर विक्रेत्यांकडून व्यापली जाणारे रस्ते कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले. याबाबत अधिकारी वर्गांकडून अपेक्षित सहकार्य मिळत असल्याचे मग या बैठकीत पुढे आले. आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे रुंदीकरण काम हाती घेण्यात येणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले.
पालघर नगर परिषद परिसरात कचरा व्यवस्थित पणे उचलला जात नसल्याने कचऱ्याचा ढीग अनेक ठिकाणी साचले आहेत, गोळा होणारा कचरा एकत्रितपणे कचराभूमीत टाकला जात असून संबंधित ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नसल्याच्या सुर बहुतांश नगरसेवकांनी या बैठकीत व्यक्त केला. या ठेकेदाराला मुदतवाढ न देता या कामी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ही प्रकिया पूर्ण होई पर्यंत जुन्या ठेकेदारामार्फत काम सुरु ठेवण्याचे या बैठकीत ठरले.
शहरातील रस्त्यांच्या साफसफाईसाठी विशेष यंत्र खरेदी करण्याचे तसेच कचरा भूमी येथे साचलेल्या सुमारे ९० हजार टन कचऱ्याचे बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट करण्याचे निश्चित करण्यात आले. याच बरोबरीने कचरा भूमी येथे विविध कामांसाठी पाण्याची आवश्यकता भासत असून भूगर्भातील पाण्याची शुद्धता कायम राहावी या दृष्टीने टेंभोडे येथील तलावाजवळ कुपनलिका खणून त्या ठिकाणाहून जलवाहिनीद्वारे कचरा भूमीपर्यंत पाण्याची व्यवस्था करण्याची देखील या बैठकीत ठरवण्यात आले.
शहरातील स्मशानभूमी येथे पर्यावरण स्नेही पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी सौर ऊर्जेच्या वापरात द्वारे अंत्यविधी करण्याचे तंत्रज्ञान बसवण्याचे ठरवण्यात आले असून ते कार्यरत झाल्यानंतर अवघ्या १०० किलो लाकडांमध्ये मृतदेहाचे दहन करणे शक्य होणार आहे. याचप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठी दहन व्यवस्था करण्याची यंत्रणा खरेदी करण्याचे देखील या बैठकीत निर्णय घेण्यात आला. वेवूर येथील स्मशानभूमीच्या लगतच्या जागेत साडेसात लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारून त्यामधून पूर्वेकडील भागाला आवश्यक दाबाने पाणीपुरवठा करणे या योजनेमुळे सुलभ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वीर सावरकर चौक दरम्यानच्या पालघर बायपास मार्गे केवळ विकास आराखड्यात नमूद असलेल्या ३० मीटर रुंदी पर्यंत रस्ते, सेवा रस्ता तसेच गटार व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करणे तसेच आवश्यकता भासल्यास टीडीआर च्या बदल्यात भूसंपादन प्रक्रिया राबवण्या बाबत सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सबतीने रस्त्याकडेच्या मर्यादा (रोड मार्जिन) ची आखरी करण्याचे देखील या बैठकीत ठरवण्यात आले.
प्रभाग निहाय स्वच्छता स्पर्धा
शहरातील स्वच्छतेमध्ये अमुलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने प्रभाग निहाय स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमात प्रपात होणाऱ्या क्रमवारी निहाय नगरपरिषद फंडाचे वाटप करण्याचे नगरपरिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे शहरातील स्वछता राखण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
राखीव भूखंडावर वाचनालय अभ्यासिका
टेंभोड येथील राखीव भूखंडावर नाट्यगृह उभारण्याचा निर्णय नगरपरिषदेने या सर्वसाधारण सभेत घेतला असून गोठणपूर येथील अशाच एका राखीव जागेवर अभ्यासिका व वाचनालय उभारण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर नगरपरिषद कार्यालयाचे संग्रहित छायाचित्र वापरावे
