नालासापोऱ्यात घरफोडी करणार्‍या चोराला रंगेहाथ अटक, नागरिकांनी केलेल्या मारहाणीची चित्रफित व्हायरल | palghar nalasopara thief beaten by people severely injured five arrested | Loksatta

नालासापोऱ्यात घरफोडी करणार्‍या चोराला रंगेहाथ अटक, नागरिकांनी केलेल्या मारहाणीची चित्रफित व्हायरल

नालासापोरा येथे घरफोडीचा प्रयत्न करणार्‍या एका सराईत चोराला नागरिकांना रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली आहे.

नालासापोऱ्यात घरफोडी करणार्‍या चोराला रंगेहाथ अटक, नागरिकांनी केलेल्या मारहाणीची चित्रफित व्हायरल
सांकेतिक फोटो

वसई- नालासापोरा येथे घरफोडीचा प्रयत्न करणार्‍या एका सराईत चोराला नागरिकांना रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेची चित्रफित सोमवारी व्हायरल झाली. पेल्हार पोलिसांनी या चोराला मारहाण करणार्‍या ५ जणांना अटक केली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या चोरावर १२ गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा >>> पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त

२९ नोव्हेंबर रोजी सकाळी नालासोपारा पश्चिमेच्या संतोषभूवन येथील एका घरात आदम खान हा घरफोडी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. मात्र नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडून मारहाण केली. या मारहाणीत खान हा जखमी झाला. पेल्हार पोलिसांनी खान याला मारहाण करणार्‍या ५ जणांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. खान याच्याविरोधातदेखील घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत खानच्या डोक्यावर तीन टाके पडले असून पायाचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा >>> जुळ्या बहिणींशी लग्न करणारा तरुण अडचणीत? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पोलिसांना निर्देश देत म्हणाल्या, “सोलापूरमधील एका…”

या मारहाणीची चित्रफित सोमवारी एका ट्टिटर खात्यावरून प्रसारित करून हा ‘मॉब लिचिंग’ चा प्रकार आहे अशी दिशाभूल करणारी अर्धवट माहिती देण्यात आली. मात्र पोलिसांनी ही माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले.

आरोपी आदम खान हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर कांदिवली येथील पोलीस ठाण्यात ११ घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यातून तो जामीनावर सुटला होता. चोरी करताना रंगेहाथ पकडल्याने नागरिकांनी त्याला मारहाण केली. मारहाण करणाऱ्या सर्वांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 10:45 IST
Next Story
पालघर: सायरस मिस्त्री यांच्या अपघात ठिकाणी धक्का शोषक यंत्रणा कार्यान्वित