बोईसर : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या नांदगावच्या हद्दीत ५७ कोटी रुपये खर्चून आकार घेत असलेल्या वारली हाट कलादालन प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. दोन वर्षांची दिलेली मुदतवाढ डिसेंबर महिन्यात संपल्यानंतरही प्रकल्प अपूर्ण राहिल्याने कलाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली, कोकणा कोळी, ठाकूर आणि कातकरी या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. त्यापैकी वारली जमात लोकसंख्येने सर्वात मोठी जमात आहे. वारली चित्रकला ही वारली जमातीच्या आदिवासी बांधवांकडून जगाला मिळालेली एक मोठी देणगी आहे. वारली समाजाच्या विविध सांस्कृतिक प्रथापरंपरांचे संगोपन आणि संवर्धन होण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्तरावर वारली संस्कृतीचे कलादालन निर्माण करण्याच्या दृष्टीने वारली हाट प्रकल्प उभारण्यात येत आहे.

Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

५७.८५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला १ जून २०१६  रोजी मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर अडीच वर्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून २० नोव्हेंबर २०१८ रोजी ३७.०५ कोटी रुपयांच्या रकमेस तांत्रिक मान्यता देण्यात येऊन जिजाऊ जेव्हीपी कंपनीला ८ मार्च २०१९ रोजी वारली हाटच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले.

दोन वर्षांत बांधकाम पूर्ण केले जाणार होते, परंतु करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने वारली हाटच्या कामाला ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढ कालावधी संपल्यानंतरही वारली हाट कलादालन प्रकल्प अपूर्णच आहे.  ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

जानेवारी महिन्याच्या १२ तारखेला वारली हाट बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत वारली हाट प्रकल्पाच्या बांधकामात होत असलेल्या दिरंगाईच्या कारणांची माहिती घेऊन निर्देश देण्यात येतील.  – डॉ. गोविंद बोडके, पालघर जिल्हाधिकारी

स्थानिकांच्या कलागुणांना वाव

आदिवासींच्या दैनंदिन जीवनाशी निगडित वस्तूंचे संग्रहालय, हस्तकलेच्या वस्तूंचे उत्पादन प्रदर्शन आणि विक्रीसाठी या ठिकाणी कलादालन निर्माण केले जात आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंसाठी योग्य भावाची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

दिल्ली हाटच्या धर्तीवर प्रकल्प

पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील महामार्गालगतच्या नांदगावतर्फे मनोर गावच्या हद्दीत पाच एकर जागेत वारली हाट प्रकल्प आकार घेत आहे. आदिवासी विकास विभागाकडून देशाची राजधानी दिल्लीतील दिल्ली हाट प्रकल्पाच्या धर्तीवर  कलादालन प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून वारली हाटच्या बांधकामासाठी ५७ कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.