पालघर : वाडा तालुक्यातील नेहरोली गावातील एका बंद घरात तीन मानवी सापळे आढळून आल्याचा प्रकार घडला आहे. आई, वडील व मुलगी अशा तिघांचीही हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वाडा – भिवंडी या राज्य महामार्गालगत असलेल्या नेहरोली गावात हा प्रकार झाला असल्याचे आज दिसून आले. ही हत्त्या १५ दिवसांपूर्वी झाल्याने तिघांच्याही शरीराचे सापळे झालेले दिसून आले.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
pune two minor girls gangraped marathi news
संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
akola gangrape marathi news
अकोला: शीतपेयात गुंगीचे औषध टाकून मुलीवर सामूहिक अत्याचार
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
Solapur, Abuse of girl Solapur, Solapur crime news,
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
Fraud with Blind couple, baby adoption,
अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक ! प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या

हेही वाचा – द्राक्षांव्यतिरिक्त अन्य फळांचे वाइन उद्योग मरणपंथाला

नेहरोली येथे गेल्या अनेक वर्षांपासून मुकुंद राठोड (७०), कांचन राठोड (६५) हे वयोवृद्ध पती पत्नी व त्यांची दिव्यांग मुलगी संगिता राठोड हे कुटुंब रहात होते. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त वसई येथे रहात आहेत. मुकुंद राठोड यांच्या नेहरोली येथील बंद घराच्या परिसरात घाण वास येत असल्याकारणाने येथील एका ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून बंद घराचा दरवाजा उघडला असता येथील एका खोलीत कांचन राठोड, व संगिता राठोड यांचा संपूर्ण सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला तर बाथरूममध्ये मुकुंद राठोड यांचा मृतदेह आढळला. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. वाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.