पालघर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असणाºया पालघर-घोटी-सिन्नर या १६० अ राष्ट्रीय महामार्गावर पाटील पाडा रस्त्यावर विक्रमगड नगर पंचायतीने बेकायदा खोदकाम केले आहे. या रस्त्याचे खडीकरण केल्यानंतर काँक्रीटीकरणाच्या कामात प्राधिकरणाकडून आता टाळाटाळ होत आहे. या विभागांच्या अंतर्गत वादामुळे नागरिक, वाहनचालकांचे मात्र हाल सुरू आहेत.

विक्रमगड नगर पंचायतीने राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तांत्रिक मंजुरी घेऊन पाच कोटी रुपयांचे काम हाती घेतले. आरंभी सुमारे २०० मीटर लांबीच्या पट्ट्यात चार ते पाच फूट खोदकाम केल्यानंतर प्राधिकरणाने हा रस्ता आपल्या ताब्यात असल्याचा दावा करत काम थांबविले. व काही दिवसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. परंतु पावसाच्या तोंडावर प्राधिकरणाने त्यांच्या ठेकेदाराकडून या भागातील खडीकरण करून नागरिकांची गैरसोय कमी केली होती. रस्त्याचे काम पूर्ण करण्याची अनुमती मिळावी यासाठी नगर पंचायतीचे प्रयत्न सुरू असताना प्राधिकरणाच्या क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाकडून ती नाकारण्यात आली. आपल्या कामाचा दर्जा हा वेगळा असल्याने प्राधिकणाने रस्त्याच्या भागावर काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

महामार्ग प्राधिकरणाला मार्च महिन्यापासून थेट सप्टेंबरच्या मध्यापर्यंत या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची संधी असताना निधीचा अभाव असल्याचे सांगत काम केले नाही. परिणामी खडी पसरवलेल्या भागात खड्डे पडत राहिल्याने मंत्री व मान्यवरांच्या दौºयाच्या वेळी देखभाल, दुरुस्तीच्या नावे त्यावर अमाप खर्च करण्यात आला. दरम्यान कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण १०७ किलोमीटरच्या पट्ट्यात रुंदीकरण, मजबुती व काँक्रीटीकरण करण्यासाठी सुमारे १९०० कोटी रुपयांची निविदा काढली जात असल्याने नगर पंचायतीने पाटील पाडा येथील खोदकाम केलेल्या रस्त्यासह वाढीव लांबीच्या दुरुस्ती व कॉंक्रीटीकरणासाठी असलेल्या २० कोटी रुपयांची निविदा रद्द केली. या पाश्र्वभूमीवर नगर पंचायतीला हे काम करण्याची अनुमती देण्यात येऊ नये तसेच हंगामी पद्धतीने दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद व्हावी यासाठी प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

खर्चाचा प्रश्न उपस्थित

विक्रमगड पाटील पाडा येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याऐवजी खडीकरण करून विक्रमगड नगर पंचायतीला सोयीचे पडावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने छुप्या पद्धतीने प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहेत. केलेल्या खडीकरणाचा खर्च नेमके कोण उचलणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे काँक्रीटीकरणाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाºया प्राधिकरणाने २०० मीटरच्या पट्ट्याचे काँक्रीटीकरण करण्याबाबत सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी कोणताही निर्णय न घेतल्याने नागरिकांना मात्र गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

गुन्हा दाखल, कारवाई नाही

विक्रमगड नगरपंचायतीने रस्त्यावर काम करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडून तांत्रिक मान्यता मिळवताना हलगर्जी केली असेल तर या प्रकरणी संबंधित अभियंता अथवा नगर अभियंता यांच्याविरुद्ध कारवाई होणे गरजेचे होते. परंतु प्राधिकरणाने खोदकाम करणाºया ठेकेदाराविरुद्ध विक्रमगड पोलीस ठाण्यात जुजबी तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. याचाच अर्थ प्राधिकरण व विक्रमगड नगरपंचायत यांच्यातील हितसंबंध स्पष्ट असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

प्राधिकरणाची भूमिका

-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाटील पाडासह विक्रमगड नगर पंचायत व जिल्ह्यातील इतर भागांमधील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व रस्त्यालगत संरक्षर्ण ंभत उभारण्याकामी २० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली होती.

-कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पालघर व नाशिक जिल्ह्यातील १६० अ राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण, दुरुस्ती व काँक्रीटीकरण कामांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

-तूर्त या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी निधीची तरतूद नसल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडून नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगण्यात आले.

-दरम्यान, हंगामी दुरुस्तीसाठी विशेष प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास विक्रमगड पाटील पाडा येथील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता ज्योर्ती ंशदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.