विक्रमगड तालुक्यातील नागझरीतील  नागेश्वर मंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

नितीन बोंबाडे

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद

डहाणू : विक्रमगड तालुक्यातील  नागझरी येथील पांडवकालीन  प्रसिद्ध नागेश्वर मंदिर नामशेष होण्याचा मार्गावर आहे. नूतनीकरणाच्या कामात मंदिराचे पुरातन अवशेष गडप झाले असून खाणाखुणाही पुसल्या गेल्या आहेत. राज्याच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे  मंदिराचे ऐतिहासिक अस्तित्व नाहीसे झाले असून याबाबत इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील नागझरी या ग्रामदान गावात  पांडवकालीन जागृत नागेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या आवारात पुरातन दगडी अवशेष आहेत. हे अवशेष काही वर्षांपूर्वी  उत्खननात सापडले आहेत. सापडलेल्या मूर्ती भग्नावस्थेत  आहेत.  ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या मंदिराचे  उत्खनन अजूनही बाकी आहे. लहान आणि मोठय़ा कमनीचे दगड, बांधकामांचे दगड, तोडीचे दगड, अनेक मुर्ती, अवजारे   सापडल्याचे ग्रामस्थ सांगतात. पुरातन मंदिराचे संपूर्ण बांधकाम  दगडी आणि लाकडी होते. मात्र उत्खनन करताना पुरातन मंदिराची वास्तू सद्यस्थितीत नसून नवीन बांधकामात ती पूर्णपणे नामशेष करण्यात आली आहे. 

 हजारो वर्षांपूर्वीची स्थापत्य आणि मूर्तीकलेचे प्रतीक असलेले नागेश्वर मंदिरचा पुरातन इतिहास नामशेष केला गेला आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या खाली अनेक ऐतिहासिक वास्तू व मूल्यवान वस्तू गाडल्या गेल्याचे एका साधूने सांगितल्याने नागेश्वर मंदिराचे खाली उत्खननाला आणि संवर्धनाला सुरुवात झाली आहे. या उत्खननात अनेक ऐतहासिक संदर्भ देणाऱ्या पुरातन मूर्ती आणि पुरातन दगडी बांधकामाचे अवशेष  सापडले. मंदिराच्या खाली उत्खननात एक शंकराची पिंड सापडली. मात्र त्यापुढे खोदकाम करण्यात नागरिकांना भीती वाटू लागल्याने त्यांनी हे काम बंद केले. उत्खननात सापडलेली मूर्ती बाहेर काढल्या. मात्र, माती आणि दगडाच्या ढिगाऱ्याखाली हजारो वर्ष दडलेला इतिहास शोधण्यात पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने उदासीनता दाखविल्यामुळे  या प्राचीन नागेश्वर मंदिराची उपेक्षा झाली आहे.

गरज नसताना नूतनीकरण

काही वर्षांपूर्वी आमदार निधीतून या मंदिराच्या नवीन बांधकामासाठी निधी मिळवून मंदिराचे नूतनीकरण करण्याचे काम करण्यात आले. परंतु हे काम गरज नसताना केले गेले. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु हे काम करत असताना त्यावर देखरेख ठेवणे प्रशासनाचे काम होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील ऐतिहासिक वास्तूला धक्का पोहाचला असून  मंदिर या नूतनीकरणाच्या कामात पांडवकालीन इतिहासाची साक्ष पुसली गेली आहे.  नवीन मंदिर बांधकामामुळे मंदिराचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि पुरातन मंदिराचे अवशेष गाडले गेले आहेत.

नागझरी हे ग्रामदान गाव आहे. ग्रामपंचायत दप्तरात पुरातन नागेश्वर मंदिराचा अहवाल शोधला  असता तो सापडला नाही. 

-रोहिदास डगला, सरपंच, नागझरी