पालघर: पालघर शहरात अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. ती पालघर शहरासाठी धोकादायक ठरत आहेत. पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे कठीण झाले आहे. मात्र ही अतिक्रमणे हटवण्याकडे प्रशासन आणि सत्ताधारी दोघांचाही कल दिसत नाही.पालघर रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या मनोर रस्त्यालगत दिवसभर हातगाडी फेरीवाले बस्तान मांडून बसलेले असतात. माहीम रस्त्यावर आजकाल मोठय़ा प्रमाणात फेरीवाले, वडा पाव, शेवपुरी, पाणीपुरीसारखे खाद्यपदार्थ तसेच फळे, फुले-हार, भाज्या विक्री करणाऱ्या हातगाडय़ांचे प्रमाण वाढत आहे. या गाडय़ांवरील ग्राहक आपल्या दुचाकी रस्त्यात उभ्या करतात. त्यामुळे विठ्ठल मंदिर, एचडीएफसी बँक परिसरात वाहतूक कोंडी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर नगर परिषदेने विकासाच्या नावाखाली कोटय़वधी रुपये खर्च करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे तयार केली आहेत मात्र त्यावरही अतिक्रमण करण्यात आले आहे. मात्र त्यावर पालिका कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. ना फेरीवाला क्षेत्र अजूनही घोषित झालेले नाही. फेरीवाला धोरणही बासनात गुंडाळून ठेवण्यात आलेले दिसते.सध्याच्या नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील रस्त्यावरच सर्वाधिक अतिक्रमणे दिसत आहेत. नगर परिषद हद्दीत ना फेरीवाला धोरण निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे अतिक्रमण, अस्वच्छता, वाहतूक कोंडी आदी समस्यांनी डोके वर काढले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pavement swallowed by encroachments in palghar amy
First published on: 05-10-2022 at 00:05 IST