पालघर : जव्हारच्या उपविभागीय अधिकारी आयुषी सिंह या जव्हार येथून सेलवास रस्त्यावरून जात असताना सिंफोनी रिसॉर्टजवळ असणाऱ्या एका गोदामात उभ्या असलेल्या ट्रकमध्ये अन्नधान्य भरत असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी तपासणी केली असता रेशनचे धान्य काळय़ा बाजारात विक्रीसाठी जमा केलेल्या अन्नधान्याचा मोठा साठा जप्त केला असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जव्हार शहरातील गोदामाजवळ उभ्या ट्रकमध्ये नॉट फॉर सेल असा शिक्का असलेल्या ५७ बारदानात गहू आढळून आला. साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जव्हार विभाग जव्हार यांनी विचारणा करताच ट्रकचालक व क्लिनर त्या ठिकाणावरून पसार झाले. ट्रक ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी आसिफ वांचेसा यांच्या मालकीचे दोन विभागांत विभागलेल्या एका गोदामात भगर भरडाईसाठी कच्चा माल (वरई साठा) आढळून आला. दुसरे गोदाम हे बंद स्थितीत आढळले. मात्र गोदामाच्या बाहेर गव्हाचे काही दाणे पडलेले असल्याने संशय निर्माण झाल्याने गोदाम मालक आसिफ वांचेसा यांच्याकडून चावी घेऊन गोदाम उघडल्यानंतर त्या ठिकाणी पाच हमाल व पिकअप वाहन रिकाम्या अवस्थेत आढळून आले. गोदामात आढळलेल्या गहू व तांदूळ भरलेल्या पोत्यांची मोजदाद केली. त्यात सुमारे दहा लाख रुपये किमतीचे बाजार भावाप्रमाणे गहू व तांदूळ असल्याचे आढळून आले.

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
alpa shah
भीमा-कोरेगाव प्रकरणात खोटे पुरावे पेरले!

गव्हाची बेकायदा विक्री

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानातील वस्तू मोठय़ा प्रमाणात काळय़ा बाजारात विक्री होत असून दलालांना इतक्या मोठय़ा प्रमाणात अन्नधान्य कोठून उपलब्ध होते याचा तपास करणे गरजेचे झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनमोल मोती नामक प्लास्टिक गोणीमध्ये भरून गहू बेकायदा विक्रीसाठी नेला जात असल्याचे दिसून आले.  नामांकित ब्रँडचे नाव लिहून जास्त दराने गहू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला जात असून रेशनचा गहू तिप्पट दराने विकला जाऊन ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत. उपलब्ध होणारे रेशन लाभार्थी गावात येणाऱ्या दलालांना रोख किंवा कांदे, बटाटे या वस्तूंच्या मोबदल्यात विकून टाकतात. यामुळे सरकारची फसवणूक होत आहे.