पालघर : जव्हारच्या उपविभागीय अधिकारी आयुषी सिंह या जव्हार येथून सेलवास रस्त्यावरून जात असताना सिंफोनी रिसॉर्टजवळ असणाऱ्या एका गोदामात उभ्या असलेल्या ट्रकमध्ये अन्नधान्य भरत असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी तपासणी केली असता रेशनचे धान्य काळय़ा बाजारात विक्रीसाठी जमा केलेल्या अन्नधान्याचा मोठा साठा जप्त केला असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जव्हार शहरातील गोदामाजवळ उभ्या ट्रकमध्ये नॉट फॉर सेल असा शिक्का असलेल्या ५७ बारदानात गहू आढळून आला. साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जव्हार विभाग जव्हार यांनी विचारणा करताच ट्रकचालक व क्लिनर त्या ठिकाणावरून पसार झाले. ट्रक ज्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी आसिफ वांचेसा यांच्या मालकीचे दोन विभागांत विभागलेल्या एका गोदामात भगर भरडाईसाठी कच्चा माल (वरई साठा) आढळून आला. दुसरे गोदाम हे बंद स्थितीत आढळले. मात्र गोदामाच्या बाहेर गव्हाचे काही दाणे पडलेले असल्याने संशय निर्माण झाल्याने गोदाम मालक आसिफ वांचेसा यांच्याकडून चावी घेऊन गोदाम उघडल्यानंतर त्या ठिकाणी पाच हमाल व पिकअप वाहन रिकाम्या अवस्थेत आढळून आले. गोदामात आढळलेल्या गहू व तांदूळ भरलेल्या पोत्यांची मोजदाद केली. त्यात सुमारे दहा लाख रुपये किमतीचे बाजार भावाप्रमाणे गहू व तांदूळ असल्याचे आढळून आले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pds food grains size before reaching black market zws
First published on: 28-06-2022 at 00:43 IST