आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत दीड महिन्यात २० कोटी रुपयांची खरेदी

रमेश पाटील

Jalgaon Massive Explosion, Maurya Chemical Company, 20 Employees Injured, jalgaon midc, fire in Maurya Chemical Company, marathi news, fire in jalgaon, jalgaon news
जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला

वाडा : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय जव्हारअंतर्गत आधारभूत खरेदी योजनेत पालघर जिल्ह्यात सन २०२१-२२ मध्ये ५ जानेवारी २०२२ पर्यंत २९८७ शेतकऱ्यांकडून  १ लाख दोन हजार १४ क्विंटल भाताची खरेदी झाली आहे. या  भाताची एकूण किंमत १९ कोटी ७९ लाख ७ हजार ९१६ रुपये इतकी आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. रोगराई, अतिवृष्टी व परतीचा पाऊस या नैसर्गिक संकटांशी सामना करीत पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामात पिकविलेल्या भाताची विक्री आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू असलेल्या एकूण ३४ आधारभूत भात खरेदी केंद्रांवर सुरू आहे. अजूनही ही खरेदी जानेवारी महिनाअखेर सुरू राहणार असून आणखी एक लाख क्विंटल भाताची खरेदी होईल, असे बोलले जात आहे. जव्हार तालुक्यात सुरु असलेल्या जव्हार व चालतवाड या दोन केंद्रांवर ५ जानेवारी २०२२ पर्यंत १०० शेतकऱ्यांकडून  २ हजार ३२० क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे. या भाताची किंमत ४५ लाख ६०० रुपये  इतकी आहे.

विक्रमगड तालुक्यात विक्रमगड, आलोंडा, साखरे, उपराळे, वसुरी, दादडे, चिंचघर अशी ७ खरेदी केंद्र आहेत. या सर्व खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ९०९ शेतकऱ्यांनी २३ हजार ८६८ क्विंटल भाताची विक्री केली आहे. या भाताची एकूण किंमत ४ कोटी ६२ लाख ८५ हजार ४९ रुपये आहे.मोखाडा तालुक्यात मोखाडा, पळसुंडा, मोरचोंडी, खोडाळा या चार खरेदी केंद्रांवर ५८ शेतकऱ्यांनी १ हजार ३९६ क्विंटल भाताची विक्री केली असून या भाताची एकूण किंमत २७ लाख ९ हजार १६ रुपये आहे. भाताचे कोठार म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या वाडा तालुक्यात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात भाताची विक्री केली जाते. या वर्षी तालुक्यात परळी, गारगांव, मानिवली, खानिवली, पोशेरी, खैरे-आंबिवली, कळंभे, गोऱ्हे, गुहिर या ९ खरेदी केंद्रांवर ५ जानेवारी २०२२ पर्यंत १ हजार ७१७ शेतकऱ्यांनी  ६९ हजार ४१ क्विंटल भाताची विक्री केली आहे. या भाताची एकूण किंमत १ कोटी ९ लाख ५५ हजार ८४३ रुपये इतकी झाली आहे.

 डहाणू, तलासरी

डहाणू व तलासरी या दोन तालुक्यांतील कासा, सायवन, गंजाड, धुंदळवाडी, उधवा, उपलाट या सहा भात खरेदी केंद्रांवर १३७ शेतकऱ्यांनी ३ हजार ६५२ क्विंटल भाताची विक्री केली आहे. या भाताची एकूण किंमत ७० लाख ८५ हजार २६८ रुपये इतकी आहे.

पालघर-वसई

पालघर व वसई या दोन तालुक्यांतील वरई, बऱ्हाणपूर, हलोली, पारगांव, शिरावली, मेढे या सहा भात खरेदी केंद्रांवर ६८ शेतकऱ्यांनी १७४७ क्विंटल भाताची विक्री केली आहे. या विक्री केलेल्या भाताची एकूण किंमत ३३ लाख ८८ हजार ४०६ रुपये आहे. भाताची विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या भाताचे शासनाकडे १० कोटी रुपये महामंडळाकडे जमा झाले असून येत्या आठवडय़ात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातील, असे जव्हारचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांनी सांगितले.

शेतकरी सानुग्रह अनुदानाच्या प्रतीक्षेत

आधारभूत खरेदीअंतर्गत भाताला शासनाने प्रति क्विंटल १९४० हा दर देण्याचे निश्चित केले आहे. या दराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासन प्रति क्विंटल ७०० रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देत असते. गतवर्षी शासनाने दोन टप्प्यांत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. या वर्षी या अनुदानाबाबत शासनाने कुठलाच निर्णय न घेतल्याने शेतकरी हे अनुदान मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

भात खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची दररोजची गर्दी पाहता भात खरेदीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात यावी.

– प्रमोद पाटील, शेतकरी, झडपोली, ता. विक्रमगड

भात खरेदी करण्याची मुदत ३१ जानेवारी २०२२ असून या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी भाताची विक्री करावी.

– विजय गांगुर्डे, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, जव्हार