पालघर जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पाऊस

अरबी सागरात व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पालघर जिल्ह्य़ात आज अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.

तालुक्याच्या ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या भाताचे नुकसान

पालघर/वाडा : अरबी सागरात व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पालघर जिल्ह्य़ात आज अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे कापणी करून ठेवलेल्या भातासह इतर व्यवसायांवर परिणाम झाला.

जिल्ह्य़ातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, पालघर, बोईसर, वाडा, डहाणू व तलासरी व इतर भागांत अनेक ठिकाणी काही वेळ पाऊस पडल्याची माहिती देण्यात येते. कापणी करून ठेवलेले भात शेतामध्ये असल्याने तसेच काही ठिकाणी झोडणी सुरू असल्याने भातपिकाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी ताडपत्री, प्लास्टीकच्या मदतीने भाताचे भारे झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र वारा पाऊस असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. यामुळे भात भिजून नुकसान झाले. या खेरीज वीटभट्टी, मिठागर व गवत संकलन केंद्रांवर गवताचा मोठा साठा असल्याने या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले. विक्रमगड तालुक्यातील मौजे कुंझ्रे परिसरात एक तास कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rain places palghar district ysh

Next Story
खते, बियाणे महाग दरात विकल्यास कारवाई
ताज्या बातम्या