पालघर : डहाणू शहरात पार नाक्याजवळ आलेली पोलीस चौकी डहाणू नगर परिषदेने १३ ऑगस्ट रोजी जमीनदोस्त केली होती. या प्रकरणात ‘लोकसत्ता’ने आवाज उठवल्यानंतर तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदविल्यानंतर जुन्याच ठिकाणी वाढीव क्षेत्रफळाची अद्ययावत पोलीस चौकी उभारण्याचे प्रशासनाने मान्यता दिली आहे.

१९६४  सालापासून डहाणू पारनाका येथे शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या चौकीकरिता सुमारे सव्वादोन गुंठय़ांचा सात-बारा उतारा पोलीस चौकीच्या नावे होता. असे असताना एका व्यावसायिकाला लाभ मिळावा या छुप्या उद्देशाने विकास आराखडय़ात मंजूर १२ मीटर रस्ता करण्याचे कारण पुढे करून ही चौकी १३ ऑगस्ट रोजी तोडण्यात आली होती. विशेष म्हणजे असे करताना पोलिसांना कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी देण्यात आली नव्हती, तसेच लगतच्या ठिकाणी असणारी अतिक्रमणाविरुद्ध डहाणू नगर परिषदेने कारवाई करण्याचे टाळले होते.

Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
bogus police
‘त्या’ बोगस पोलिसाला बॅच कोणती ते सांगता आले नाही 
Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष

डहाणू नगर परिषदेच्या पक्षपाती धोरणाचा तसेच गरज नसताना पोलीस चौकी तोडण्याच्या या प्रकरणात डहाणूच्या नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली, तसेच समाजमाध्यमांवर अनेक दिवस चर्चा सुरू राहिली होती. ‘लोकसत्ता’मध्ये या संदर्भात प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन आमदार विनोद निकोले यांनी कम्युनिस्ट पक्षाने आयोजित मोर्चात सहभागी होऊन पोलीस चौकी पूर्ववत उभारण्याची मागणी महसूल विभागाकडे केली होती.

पालघर पोलिसांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. एकंदर परिस्थितीचा विचार करून डहाणू पारनाका येथील चौकी त्याच ठिकाणी उभारण्याचे निश्चित झाले असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या चौकीसाठी सुमारे साडेतीन गुंठे अशी वाढीव जागा प्रशासनाने मंजूर केली आहे. ही चौकी नगर परिषदेतमार्फत बांधण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता जुनी चौकीत गळती होत होती. त्याऐवजी त्याच ठिकाणी अद्ययावत व वाढीव क्षेत्रफळाची चौकी उभारण्यात येईल, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले.

रस्त्यासाठी लगतचे अतिक्रमण काढणार

१२ मीटर रुंदीचा विकास आराखडय़ात समुद्राकडे जाणारा मंजूर रस्ता उभारण्यासाठी पोलीस चौकी अबाधित ठेवून लगतचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे पोलीस चौकी जमीनदोस्त केल्याने उद्भवलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.