पालघर : डहाणू शहरात पार नाक्याजवळ आलेली पोलीस चौकी डहाणू नगर परिषदेने १३ ऑगस्ट रोजी जमीनदोस्त केली होती. या प्रकरणात ‘लोकसत्ता’ने आवाज उठवल्यानंतर तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदविल्यानंतर जुन्याच ठिकाणी वाढीव क्षेत्रफळाची अद्ययावत पोलीस चौकी उभारण्याचे प्रशासनाने मान्यता दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६४  सालापासून डहाणू पारनाका येथे शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या चौकीकरिता सुमारे सव्वादोन गुंठय़ांचा सात-बारा उतारा पोलीस चौकीच्या नावे होता. असे असताना एका व्यावसायिकाला लाभ मिळावा या छुप्या उद्देशाने विकास आराखडय़ात मंजूर १२ मीटर रस्ता करण्याचे कारण पुढे करून ही चौकी १३ ऑगस्ट रोजी तोडण्यात आली होती. विशेष म्हणजे असे करताना पोलिसांना कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी देण्यात आली नव्हती, तसेच लगतच्या ठिकाणी असणारी अतिक्रमणाविरुद्ध डहाणू नगर परिषदेने कारवाई करण्याचे टाळले होते.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reconstruction police station constructed place increased area ysh
First published on: 20-09-2022 at 00:02 IST