पालघर: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पश्चिम दिशेने रस्त्याच्या दुतर्फा गटाराची उभारणी केली जात आहे. मात्र या पाण्याला निचरा होण्याचा मार्ग नसल्यामुळे या गटारातील पाणी आणि त्या भागातील लोकवस्तीतील सांडपाणी वागुळसार मंदिराजवळ तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस पडल्यानंतर वागुळसार गणपती मंदिराजवळ पाणी तुंबून रस्ता बंद होतच असे पण आता नव्या गटारामुळे ही समस्या अधिकच गंभीर होईल, अशी शक्यता आहे.
पालघर शहराच्या पश्चिम बाजूचे पावसाचे पाणी प्रामुख्याने पाच मार्गानी समुद्रात जाते. उत्तरेकडे रेल्वे मार्गालगत मोकळय़ा जागेतून दूध नदीत, टेंबोडे येथील रेणुका कॉम्प्लेक्सनजीकच्या नाल्यातून अल्याळी आणि नंतर शिरगाव-सातपाटी खाडी क्षेत्रात, माहीम रस्त्यालगत वागुळसार आणि त्यापुढे पाणेरी, गिरिराज अपार्टमेंटलगत कमला पार्क, विष्णूनगर मार्गे पाणेरी नदी आणि पालघर न्यायालय, लोकमान्य नगर भागातून आयकर कार्यालयीनजिकच्या नाल्यातून पालघर शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होतो.
सार्वजनिक बांधकाम विभाग बायपास मार्ग आणि पुढे माहीम मार्गालगत नव्याने बांधत असलेल्या गटारामुळे पालघर शहरातील, मध्य भागातील घरगुती सांडपाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळून रेणुका कॉम्प्लेक्समार्गे जाणाऱ्या नाल्याचे पाणी सुधारित रचनेनंतर बायपास मार्गावरून माहीम रस्त्यावरील गटाराच्या मार्गे पुढे पाणेरी ओहोळाच्या दिशेने जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र बायपास मार्गालगत नव्याने गटार उभारणी केली जात असल्याने यापुढे पालघरमधील पाणी महिमा रोडच्या दिशेने जाईल.
पालघर नगर परिषद हद्दीत वीर सावरकर चौकापासून वागुळसार गावापर्यंत रस्त्यालगत अनेक गृहसंकुले उभारण्यात आली आहेत. त्यांची सांडपाणी निचरा व्यवस्था पुरेशा क्षमतेची नसल्याने पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी उभारलेल्या या गटारात घरगुती सांडपाणी मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या गटाराची जोड पुढे नैसर्गिक पाणी वाहून नेणाऱ्या स्रोतापर्यंत नसल्याने या गटारातील सांडपाणी वागुळसार येथील श्री गणपती मंदिरापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन गटार योजना करताना पावसाच्या पाण्याचा विचार केला आहे. परंतु छुप्या मार्गाने रेणुका कॉम्प्लेक्स शेजारून जाणाऱ्या नाल्यातील पाणी वळवण्याचा घाट राजकीय मंडळींच्या मदतीने घातला जात असल्याचा आरोप होतो आहे.
पालघर शहरासह सुंदरम् शाळेजवळील लोकवस्तीतून सेप्टिक टँकमधील पाणी तसेच चेंबरमधील पाणी थेट गटारांमध्ये सोडले जाते. मलमूत्रमिश्रीत सांडपाणी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था कारवाईबाबत उदासीन आहेत.
बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र देणाऱ्या शासकीय विभागाने इमारतीचे सांडपाणी पावसाळी पाणी वाहणाऱ्या गटारांमध्ये मिसळणार नाही याची खातरजमा करायला हवी. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे माहीम मार्गावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात येणारी गटारे नैसर्गिक नाल्यापर्यंत पाणी पोहोचवतील याची आखणी व दक्षता घेण्यात येत आहे.-सचिन धात्रक, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना