नीरज राऊत

पालघर : मोखाडा तालुक्यातील वाशाळा या पांडवलेणीच्या ठिकाणी पर्यटन विकासासाठी विविध माध्यमांतून जिल्हा स्थापनेपासून किमान नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील सात कोटी खर्च झाले असताना पर्यटन स्थळ  दुर्लक्षित राहिले आहे. या परिसरातील   रस्ते अपूर्ण, अरुंद आणि काही ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळते. 

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

मोखाडा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या वाशाळा गावाच्या सर्वागीण विकासासाठी गांधी पूल- सातुर्ली- वाशाळा- पिंपळपाडा- मडक्याची मेट- चारणवाडी अशा रस्त्याचे काम अनेकदा झाले तरी त्यांची अवस्था दयनीय आहे. या रस्त्यावर उलट- सुलट दिशेने वेगवेगळय़ा साखळी क्रमांकाने कामे उल्लेखित करून ते केल्याचे सांगण्यात येते. याखेरीज आदिवासी विकास विभागामधून पिंपळपाडा- टोकरखांड, वाशाळा-चारणवाडी व साखरे- वाशाळा या रस्त्यांसाठी सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी काम झाले असून या रस्त्याकरिता प्रत्येकी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च झाला होता. यापैकी अधिकांश रस्त्यांवर फक्त खडी व डांबर अंथरल्याचे दिसून येते.  खडीकरण प्रत्यक्षात झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. या रस्त्यांच्या कामाची दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करून घेण्यात यावी अशी मागणी आहे. या रस्त्यालगत गटार खाणण्याचे काम व जिल्हा परिषद अंतर्गत मोऱ्या बांधण्याचे काम नव्याने हाती घेण्यात आले आहेत.  २०१८-१९ या वर्षी पर्यटन विभागाच्या अंतर्गत वाशाळा पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सुमारे सव्वाचार कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यापैकी अजूनही अनेक कामे अपूर्णावस्थेत आहे. हाती घेतलेल्या कामाचा तपशील कोणत्याही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला नाही. 

याच कालावधीत जिल्हा परिषद पांडवलेणी परिसरात सुधारणा करण्यासाठी व बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचे काम पूर्ण झाल्याची नोंद असून या कामावर झालेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्याची मागणीदेखील आहे.  काही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेकडून एकाच वेळी झाली असल्याने दुबार कामांचा गैरफायदा घेऊन पैशाचा योग्य पद्धतीने विनियोग झाला नसल्याचे दिसून येत आहे.

तलाव सुशोभीकरण खर्चीक

वाशाळा येथील तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी जिल्हा परिषदअंतर्गत झालेल्या कामांना रंगरंगोटी करून नव्याने खर्च दाखवण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असल्याचे आरोप होत आहेत. या तलावाचे दोन घाट व आपल्या बाजूचे रिटेिनग वॉल यापूर्वी बांधले असताना या तलावाच्या सुशोभीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असून त्याचा तपशील काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जव्हार-मोखाडा भागात सुरू असणाऱ्या कामांचा तपशील व खर्च कामाच्या ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील.

– विजय सपकाळ, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार