कोषागार कार्यालयाच्या निर्णयामुळे मूळ आस्थापनेत जाण्यासाठी कर्मचाऱ्यांचा प्रयत्न

पालघर : पालघर जिल्हा मुख्यालय बिगर अनुसूचित क्षेत्रात येत असल्यामुळे मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वेतनात एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ मिळणार नाही. मात्र या मुख्यालयामध्ये अनुसूचित क्षेत्रात मूळ स्थापन असलेल्या कर्मचारी वर्ग प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर आलेल्या या कर्मचारी वर्गाचे एकस्तर वेतन कपात करणार का अशी चर्चा आता कर्मचारी वर्गामध्ये केली जात आहे.

gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…

अनुसूचित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन म्हणजे प्रोत्साहन भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात येतो. या क्षेत्रामध्ये काम करत नसलेल्या कर्मचाऱ्यांना तो मिळत असला तरी अत्यल्प आहे. आता जिल्हा मुख्यालय अनुसूचित क्षेत्रात नसल्यामुळे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात इतर लाभ देता येणे शक्य नाही असे अलीकडे कोषागार कार्यालयाने म्हटले होते. अनुसूचित क्षेत्रातील पंचायत समित्या व महसूल आस्थापनांमधून जिल्हा मुख्यालयात कर्मचारीवर्ग प्रतिनियुक्तीने काम करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या एकस्तर वेतनाबाबतीत कोषागार कार्यालय काय धोरण ठरवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे पंचायत समिती यांसह तहसीलदार कार्यालय व इतर आस्थापनांच्या ठिकाणाहून काही कर्मचारी काम करण्यासाठी जिल्हा मुख्यालयात प्रतिनियुक्ती तत्त्वावर घेण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची मूळ आस्थापना पेसा क्षेत्रातील म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना तेथील वेतनाचा लाभ मिळत आहे. त्यांचे वेतन त्यांच्या मूळ पदाच्या ठिकाणी काढले जात आहे. असे असले तरी ते सद्यस्थितीत जिल्हा मुख्यालयात काम करीत आहेत. याचाच अर्थ ते अनुसूचित क्षेत्रात काम करत नाहीत. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर आलेल्या या कर्मचाऱ्यांना वेतनात मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यासह घरभाडे भत्त्याचा लाभ मिळणार की नाही अशा उलटसुलट चर्चाना जिल्हा परिषद कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयात उधाण आले आहे. याचबरोबरीने आपण अनुसूचित क्षेत्रात प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे आपल्याला वेतनामध्ये लाभ मिळणार नाही असे गृहीत धरून काही कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ आस्थापनेवर जाण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे समजते.

अनुसूचित क्षेत्रात काम करण्यास पसंती

आदिवासी भागात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या १५ टक्के दिला जातो. याच बरोबरीने नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका अशा क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कार्यालये असल्यास त्यांना अधिकचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्गवारीनुसार दिला जातो. वसई पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना १६ टक्के घरभाडे भत्त्याचा लाभ मिळत आहे, तर इतर तालुक्यांतील कर्मचारी वर्गाला ८ टक्केच लाभ मिळतो. या लाभापोटी काही कर्मचारी अनुसूचित क्षेत्रातच काम करणे पसंत करतात.

मुख्यालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे प्रशासनाची गरज म्हणून कर्मचारी वर्गाला अनुसूचित क्षेत्राच्या कार्यालयांमधून प्रतिनियुक्तीवर आणले गेले आहेत. प्रतिनियुक्तीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मूळ आस्थापना अनुसूचित क्षेत्रातील असल्यास त्यांना तेथील वेतनश्रेणीचाच लाभ दिला जाणार आहे.

– संघरत्न खिलारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि. प., पालघर