scorecardresearch

Premium

पालघर जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकींची रणधुमाळी सुरू, ५ नोव्हेंबरला मतदान तर सहा नोव्हेंबरला निकाल

२०६८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी पाच नोव्हेंबरला मतदान होणार असून दुसर्‍या दिवशी सहा नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.

schedule of gram panchayat elections
प्रातिनिधिक फोटो

बोईसर : राज्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये २२९६ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक तर २०६८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी पाच नोव्हेंबरला मतदान होणार असून दुसर्‍या दिवशी सहा नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सात तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.  तर ४९ ग्रामपंचायतीमधील ८९ प्रभागांमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

jalgaon list of election booths, jalgaon assembly constituencies
ग्रामपंचायचतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम; आचारसंहिताही लागू
15 villages najar paisewari above 50 paise
गोंदिया : ९१५ गावांची नजर पैसेवारी ५० पैशाच्या वर, अतोनात नुकसान तरीही…
one center for 1500 voters
आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत १५०० मतदारांसाठी होणार एक केंद्र… जाणून घ्या मतदान केंद्रांची रचना
voter ID
अंतिम मतदार यादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

हेही वाचा >>> शिरगावच्या स्वच्छ किनाऱ्यावर अधिकारी वर्गाने राबवली स्वच्छता मोहीम, १ तारीख १ तास स्वच्छतेसाठी केले श्रमदान

निवडणुकीचे टप्पे

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक:

दिनांक ०६/१०/२०२३ (शुक्रवार)

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ:

दिनांक १६/१०/२०२३ (सोमवार) ते दिनांक २०/१०/२०२३ (शुक्रवार) वेळ स.११.०० ते दु.३.००

नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ: दिनांक २३/१०/२०२३ (सोमवार) सकाळी ११.०० वाजेपासून छाननी संपेपर्यंत

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ:दिनांक २५/१०/२०२३ (बुधवार),दुपारी ३.०० वा. पर्यंत

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ :

दिनांक २५/१०/२०२३ (बुधवार),दुपारी ३.०० वाजेनंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक:

दिनांक ०५/११/२०२३ (रविवार),सकाळी ७.३० वाजेपासून ते सायं.५.३० वाजेपर्यंत

मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक: दिनांक ०६/११/२०२३ (सोमवार)

अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक: दिनांक ०९/११/२०२३ (गुरुवार) पर्यंत

पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका :

जव्हार : वाळवंडा

वसई : सायवन, अर्नाळा, अर्नाळा किल्ला

तलासरी : गिरगाव, कूर्झे, घिमानिया, करजगाव, उधवा, कवाडा, वेवजी, उपलाट

विक्रमगड : चाबके तलावली, मलवाडा,

पालघर : सालवड, खानीवडे, लालठाणे, उच्छेळी, उनभाट, टेंभी खोडावे, चटाळे, लालोंडे, जलसार, कपासे, मासवण, शिरगाव, खैरापाडा, सरावली, शिल्टे, माहीम

डहाणू : आंबेसरी, मोडगाव, कापशी, दाभोण, दापचरी, गांगणगाव, सावटा, बोर्डी, गोवणे, जांबुगाव, कीन्हवली, वंकास, राई, सोगवे, चारोटी, दाभाडी, चिंचणी मोखाडा : सायदे, किनिस्ते, चास, डोल्हारा

Latest Comment
View All Comments
Post Comment

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Schedule of gram panchayat elections announced by state election commission zws

First published on: 03-10-2023 at 22:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×